भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) महिला प्रीमियर लीग 2025 (WPL 2025) चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 14 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर अंतिम सामना 15 मार्च रोजी खेळला जाईल. यावेळी ही स्पर्धा एकूण चार शहरांमध्ये खेळली जाईल. महिला प्रीमियर लीग 2025 मध्ये पाच संघांमध्ये एकूण 22 सामने होतील.
यावेळी स्पर्धेचा पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात होईल, जो वडोदरा येथे होणार आहे. अंतिम सामना मुंबईत होईल. स्पर्धेतील सामने वडोदरा, मुंबई, लखनऊ आणि बंगळुरू या चार शहरांत होतील. स्पर्धेतील पहिले 6 सामने बडोद्यातील नव्यानं बांधलेल्या बीसीए स्टेडियममध्ये खेळले जातील. यानंतर ही स्पर्धा बंगळुरूला हलवली जाईल, जिथे एकूण 8 सामने खेळले जातील. यानंतर ही स्पर्धा लखनमऊध्ये होईल, जिथे 4 सामने खेळले जातील. त्यानंतर अंतिम टप्प्यात स्पर्धा मुंबईत पोहोचेल. मुंबईत नॉकआउट (एलिमिनेटर आणि अंतिम) यासह चार सामने होतील.
बंगळुरूमध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. त्यानंतर लखनऊमध्ये पहिला सामना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होईल. त्याच वेळी, मुंबईच्या शेवटच्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जाईल. स्पर्धेतील सर्वाधिक 8 सामने बंगळुरूमध्ये होतील. सर्व सामने सिंगल हेडर असतील, म्हणजेच एका दिवसात फक्त एकच सामना खेळला जाईल.
गेल्या हंगामातील सर्व 22 सामने बंगळुरू आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये खेळले गेले होते. यावेळी स्पर्धेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी यावर्षी एकूण 4 शहरांची निवड करण्यात आली. 2023 मध्ये खेळला गेलेला महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम केवळ मुंबईत आयोजित आला होता.
हेही वाचा –
आरसीबीचा ‘फ्लाइंग मॅन’! हवेत उडी मारून घेतला अद्भूत झेल; व्हायरल VIDEO पाहा
अविश्वसनीय! वनडे क्रिकेटमध्ये या भारतीय फलंदाजाची तीन आकडी सरासरी, आता तरी संघात संधी मिळेल का?
जसप्रीत बुमराहनं घेतला फेक न्यूज पसरवणाऱ्यांचा समाचार, फिटनेसच्या अफवांना थेट उत्तर