मागीलवर्षी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा प्रदर्शनिय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्याचे यश पाहुन यावर्षीही आयपीएलमध्ये महिलांच्या 4 टी20 सामन्यांची प्रदर्शनीय मालिका खेळवली जाणार आहे.
या महिला ट्वेंटी20 चॅलेंज मालिकेत यावर्षी सुपरनोवा आणि ट्रेलब्लेझर्ससह वेलोसिटी हा नवीन संघ सहभागी होणार आहेत. तसेच ही स्पर्धा आयपीएलच्या प्लेऑफ दरम्यान 6 मे ते 11 मे रोजी जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत हरमनप्रीत कौर, स्म्रीती मानधना आणि मिताली राज या अनुक्रमे सुपरनोवा, ट्रेलब्लेझर्स आणि वेलोसिटी संघाचे नेतृत्व करणार आहेत. तसेच भारतातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंसह इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांतील महिला क्रिकेटपटूही या स्पर्धेत सामील होणार आहेत.
प्रत्येक संघात 4 परदेशी खेळाडूंसह 13 खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसेच डब्ल्यूव्ही रमण हे सुपरनोवा संघाचे, बीजू जॉर्ज ट्रेलब्लेझर्सचे आणि ममता माबेन या वेलोसिटी संघाचे प्रशिक्षक असतील.
असे आहेत सर्व संघ –
सुपरनोवा – हरमनप्रीत कौर (कर्णधार), अनुजा पाटील, अरुंधती रेड्डी, चमेरी अथापथु (श्रीलंका), जेमिमा रोड्रिगेज, ली ताहुहु (न्यूझीलंड), मानसी जोशी, नताली सायव्हर (इंग्लंड), पूनम यादव, प्रिया पुनिया, राधा पी यादव, सोफी डिवाईन (न्यूझीलंड), तानिया भाटिया (यष्टीरक्षक).
ट्रेलब्लेझर्स – स्म्रीती मानधना (कर्णधार), भारती फुल्मली, दयालन हेमलता, दिप्ती शर्मा, हरलीन देवोल, जसिया अख्तर, झुलन गोस्वामी, आर कल्पना (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, शाकिरा सेल्मन (वेस्टइंडीज), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), स्टॅफनी टेलर (वेस्ट इंडिज), सुजी बेट्स (न्यूझीलंड).
वेलोसिटी – मिताली राज (कर्णधार), अमेलिया केर (न्यूझीलंड), डॅनिएल वॅट (इंग्लंड), देविका वैद्य, एकता बिष्त, हेले मॅथ्यूज (वेस्टइंडीज), जहानारा आलम (बांग्लादेश), कोमल झांझाड, शाफाली वर्मा, शिखा पांडे, सुष्मा वर्मा (यष्टीरक्षक), सुश्री दिव्यदर्षणी, वेदा कृष्णमूर्ती.
महत्त्वाच्या बातम्या –
–या क्रिकेट लीगमधून शेन वॉटसनने केली निवृत्तीची घोषणा
–आयपीएल २०१९ संपण्यापूर्वीच हे परदेशी खेळाडू परतणार मायदेशी
–Video: अविश्वसनीय! डिविलियर्सने एका हाताने मारला असा षटकार की चेंडू थेट गेला छतावर