भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला भारताच्या महान कर्णधारांमध्ये गणले जाते. तसेच तो भारताचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधारही आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे विश्वचषक, टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच त्याने भारताचे नेतृत्व करताना अनेक विक्रमही केले आहे.
धोनीने 2007 ते 2016 दरम्यान भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. पण त्याने जानेवारी 2017 मध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडले. तर त्याआधीच धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
त्यामुळे कसोटी क्रिकेटबरोबरच मर्यादीत षटकांच्या क्रिकेटसाठीही भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा विराट कोहलीकडे सोपवण्यात आली होती.
मात्र आता धोनीने भारताचे कर्णधारपद सोडून जवळजवळ दोन वर्ष झाल्यानंतरही बीसीसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर धोनीच्या प्रोफाइलमध्ये ठळक अक्षरात कर्णधार असे लिहिले आहे.
तसेच सध्याचा भारताचा कर्णधार विराटच्या प्रोफाइलमध्ये फलंदाज आणि त्यापुढे कंसात कर्णधार असे लिहिले आहे.
धोनीने भारताचे 199 वनडे, 60 कसोटी आणि 72 टी20 असे मिळून एकूण 331 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे. तसेच तो सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–म्हणून अर्जुन तेंडुलकरला पाहुन झाली सचिनच्या वनडे पदार्पणाची आठवण
–एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम, रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा
–अॅडम गिलक्रिस्ट म्हणतो हा फिरकीपटू मला घाम फोडायचा