दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025 चा अंतिम सामना 11 जूनपासून प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याच्या सुरुवातीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने दक्षिण आफ्रिकेला थेट इशारा देत म्हटले आहे की, सध्या त्याचा आत्मविश्वास वाढला आहे आणि तो अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या डब्ल्यूटीसी 2025 फायनलपूर्वी तो सर्वोत्तम गोलंदाजी करत असल्याचे हेझलवूडचे मत आहे. तो क्रिकेट डॉट कॉम एयू ला म्हणाला, जोपर्यंत खांदा ठीक असतो तेव्हा मी नेहमीच पुनरागमनाचा विचार करतो. आणि हे यावेळी देखील घडेल. हे दोन आठवडे चांगले गेले, जिथे सर्व काही योजनेनुसार घडले. आयपीएल फायनल जिंकणे हा एक अद्भुत अनुभव होता.
हेझलवूडने भारताविरुद्धच्या गेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये तो चुकला होता तेव्हाची आठवण सांगितली. त्यानंतर वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने त्याची जागा घेतली आणि सामन्यात पाच विकेट्स घेत कांगारू संघाला विजय मिळवून दिला. हेझलवूडला वाटते की गेल्या वर्षी त्याचे आकडे चांगले होते आणि त्याला आशा आहे की यावेळी त्याचे शरीर त्याला साथ देईल.
डब्ल्यूटीसी 2023 च्या अंतिम फेरीत न खेळण्याबाबत हेझलवूड म्हणाला, ‘गेल्या वेळी मी खेळण्याच्या अगदी जवळ होतो, पण त्याआधी आयपीएलमध्ये काही अडचणी आल्या आणि मी तेवढी चांगली कामगिरी करू शकलो नाही. पण सध्या मला चांगल्या स्थितीत वाटते आणि मला वाटते की गेल्या दोन वर्षांत कोणत्याही फॉरमॅटमध्ये माझे आकडे खूपच चांगले राहिले आहेत. म्हणूनच मला परत मिळवण्यासाठी खूप काही आहे.’