भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल स्टेडियमवर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपल्यानंतरही सामना कुठे जाईल हे अजून समजलेले नाही. चार दिवसांच्या खेळानंतर दोन्ही संघ जरी बरोबरीत असले तरी मैदानाबाहेर मात्र भारतीय चाहत्यांचे वर्चस्व आहे. स्टेडियमचे वातावरण पाहून असे वाटत नाही की सामना भारताबाहेर होत आहे.
भारतीय संघाची ‘फॅन फॉलोइंग’ कोणापासून लपलेली नाही. जगातील कुठल्याही कोपऱ्यात जिथे जिथे सामना होतो तिथे तिथे भारतीय क्रिकेटप्रेमी पोहोचतात. आता इंग्लंडच्या ‘बार्मी आर्मी’च्या धर्तीवर भारतीय चाहत्यांचा एक क्लब देखील आहे. ‘भारत आर्मी’ नावाची ही संस्था भारतीय क्रिकेट संघाला नेहमीच पाठिंबा देत असते. ही संस्था खेळाडूंच्या नावाने गाणी तयार करतात. त्यांचे सर्व साथीदार एका सुरात ते गातात आणि संगीताचा आनंद घेतात.
असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ओव्हल कसोटी दरम्यानच्या असलेल्या या व्हिडिओमध्येही तेच दिसून येत आहे. ढोलच्या तालावर चाहत्यांकडून भांगडा केला जात आहे. कर्णधार कोहलीच्या संघाला यामुळे पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडीओ खूप पसंत केला जात आहे. ‘भारतीय आर्मी’ चे सदस्य रंगीबेरंगी कपड्यांमध्ये प्रचंड आनंद घेत आहेत.
https://www.instagram.com/p/CTbtQflgvfL/
ओव्हल कसोटीत अखेरच्या दिवशी तिन्ही निकाल शक्य आहेत. इंग्लंडला विजयासाठी २९१ धावांची गरज आहे, तर भारताला १० विकेट्सची. तसेच ज्याप्रकारे खेळपट्टी सपाट आहे, जर फलंदाज टिकून खेळले तर ही चौथी कसोटीही अनिर्णित देखील होऊ शकते.
शार्दुल ठाकूर आणि रिषभ पंत यांच्या ७ व्या विकेटमधील १०० धावांच्या भागीदारीमुळे, तसेच त्यापूर्वी रोहित शर्माने केलेल्या शतकी खेळीमुळे भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडसमोर ३६८ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले आहे.
पहिल्या डावात १९१ धावांवर बाद झालेला भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४६६ धावा केल्या. यजमान इंग्लंड संघाने पहिल्या डावात २९० धावा केल्या आणि पाहुण्या संघावर ९९ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात ५७ धावा करणाऱ्या शार्दुलने दुसऱ्या डावात ७२ चेंडूत ६० धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. पंतने १०६ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. भारतासाठी दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्माने १२७ आणि चेतेश्वर पुजाराने ६१ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार कोहलीची रहाणेला संघाबाहेर करण्याची तयारी! ‘हे’ निर्णय देत आहेत संकेत
केवढा हा राग! रनआउट झाला म्हणून कॅरिबियन खेळाडूने केले ‘असे’ कृत्य, व्हिडिओ होतोय व्हायरल