भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. साउथम्प्टनच्या रोज बाउल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात, पहिल्या दिवशी (१८ जून) पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे या सामन्याचा प्रारंभ दुसऱ्या दिवसापासून करण्यात आला.
पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर भारतीय संघाचे चाहते थोडे निराश झाले होते. तरीदेखील त्यांच्या उत्साहात कमतरता जाणवली नव्हती. पूर्ण दिवस त्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून जल्लोष साजरा केला. अशातच सोशल मीडियावर चाहत्यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते रोहित शर्मासाठी एक खास गाणे गात असताना दिसून येत आहेत.
मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भारत आर्मीतील सदस्य रोहित शर्मासाठी खास गाणे गात असताना दिसून येत आहेत. शीर्षक ‘रोहित शर्मा भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू’ आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीचा ठरत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे.
भारत आर्मीतील सदस्य जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात सामना असला तरीही भारतीय संघाला समर्थन करण्यासाठी हजेरी लावत असतात. साउथम्प्टनमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात चाहत्यांना देखील मैदानात येऊन सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे.(bharat army sung hitman song in Southampton video went viral on social media)
https://www.instagram.com/tv/CQQYXYrDauE/?utm_medium=copy_link
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून सलामी फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि शुबमन गिलने ६२ धावा जोडल्या. रोहित शर्मा ३४ आणि शुबमन गिल २८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराला या सामन्यात देखील फॉर्म गवसाताना दिसून येत नाहीये. तो अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. कर्णधार कोहली नाबाद ४४ धावा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे २९ धावा करत मैदानावर टिकून आहेत. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेट रसिकांना घडले विराटच्या अप्रतिम कव्हर ड्राईव्हचे दर्शन अन् पाकिस्तानी कर्णधार झाला ट्रोल
रॅप सॉन्गला ढोलचा तडाखा! भारतीय चाहत्यांनी विशेष पद्धतीने ‘किंग कोहली’ला केले चीयर