भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारने ट्विटरवर चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. त्याला ट्विटरवर १ मिलियन फॉलोवर्स झाले आहेत.
त्याने त्याचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट करून लिहिले आहे की “१ ते १ मिलियन. सगळ्यांचे धन्यवाद. मी तुमच्यातील प्रत्येकापर्यंत पोहचू शकत नाही पण तुमच्या अखंड पाठिंब्याचे कौतुक करतो.”
From 1 to 1M, Thankyou so much everyone, I cannot get back to each one of you but I always appreciate the unaltered support. 👍🏻 pic.twitter.com/83nPNrK4ei
— Bhuvneshwar Kumar (@BhuviOfficial) October 21, 2017
भुवनेश्वर आत्तापर्यंत १८ कसोटी, ७६ वनडे आणि २० टी २० सामने खेळला आहे. त्याने कसोटीत एकूण ४५ बळी घेतले आहेत. तर वनडेत ८१ बळी घेतले आहेत आणि टी २० मध्ये १९ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर त्याची कसोटीत फलंदाजी करताना ३ अर्धशतके आहेत आणि वनडेत १ अर्धशतक आहे.
भुवनेश्वर सध्या न्यूजीलँड विरुद्ध चालू असलेल्या वनडे मालिकेत व्यस्त आहे. २५ ऑक्टोबरला भारताची पुण्यात २ री वनडे होणार आहे. पहिला वनडे भारताने काल हरला होता.