इंडियन प्रीमियर लीगच्या सनरायझर्स हैरदाबाद संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामातून बाहेर पडला आहे. २ ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना भुवनेश्वरला दुखापत झाली होती. पुढे तो सामन्यातून बाहेर पडला होता.
मात्र रविवारी (४ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यावेळी नाणेफेक झाल्यानंतर वॉर्नरने सांगितले होते की, “दुखापतीमुळे भुवनेश्वर पुढील १-२ सामने खेळू शकणार नाही.” पण माध्यमातील वृत्तांनुसार, भुवनेश्वरची दुखापत जास्तच गंभीर असल्यामुळे तो आयपीएल २०२०मधून बाहेर झाला आहे.
असे असले तरी, भुवनेश्वर यावर्षी जास्त लयीत असल्याचे दिसत नव्हते. कारण त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये फक्त ३ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलव्यतिरिक्त भुवनेश्वर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरदेखील अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही संघांदरम्यान ३ डिसेंबरपासून ते १७ जानेवारीपर्यंत ४ सामन्यांची कसोटी आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ‘हे’ ३ मोठे विक्रम असतील विराट कोहलीच्या निशाण्यावर
अरर… आता कसं व्हायचं!, बेंगलोरच्या धुरंधरला रडवणारा दिल्लीचा गोलंदाज संघाबाहेर, पाहा काय आहे कारण
दोस्ती असावी तर अशी! स्वत:ला मिळालेला पुरस्कार दिला मित्राला
ट्रेंडिंग लेख-
दरवर्षी मैदान गाजवणाऱ्या ३ खेळडूंना यंदा आयपीएलमध्ये अजूनही मिळाली नाही खेळण्याची संधी
‘या’ ४ कारणांमुळे कमलेश नागरकोटीला भारतीय संघात मिळणार स्थान
आयपीएलच्या ‘या’ ५ संघांतील गोलंदाजांना तोड नाही, केलाय सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा