ब्राझिलचे प्रशिक्षक टिटे यांना 2022च्या वर्षाखेरपर्यंत तसेच कतार मधील फिफा विश्वचषकासाठी प्रशिक्षक पदावर कायम ठेवण्यात आले आहे. त्यांनी ऑगस्ट 2016पासून या पदाचा कार्यभार स्विकारला.
ब्राझिल प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवून मिळणारे टिटे हे क्लाउडिओ काऊंटिन्हो यांच्यानंतरचे दुसरेच प्रशिक्षक आहेत.
जे संघ रशियातील फिफा विश्वचषकातून बाहेर पडले त्यांच्या काही प्रशिक्षकांना पदावरून पायउतार व्हावे लागले. पण टिटे यांच्यावर ब्राझिल संघाने परत एकदा विश्वास दाखवला आहे.
ब्राझिलचा संघ या विश्वचषकातील उपांत्यपूर्व सामन्यात बेल्जियमकडून पराभूत झाल्याने स्पर्धेबाहेर पडला होता.
टिटे यांच्या कार्यकाळात संघाने 20 सामने जिंकले असून 4 अनिर्णीत आणि 2 सामने हरले आहेत.
तसेच ब्राझिल संघाचे समन्वयक इडू गॅस्पर यांचाही करार 2022च्या विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला आहे.
ब्राझिल फुटबॉलचे अध्यक्ष रोजरीओ कॅबोोक्लो यांच्या मते हे 2022च्या कतार मधील फिफा विश्वचषकासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
ब्राझिलच्या 7 आणि 11 सप्टेंबरला अमेरिकेत मैत्रीपूर्ण सामने असून यातील पहिला सामना अमेरिके विरुद्ध तर दुसरा संघ अजून निश्चित नाही.
तसेच 2019ची कोपा अमेरिका ही स्पर्धा ब्राझिलमध्ये आहे. यासाठी संघाला घरच्या मैदानावर चाहत्यांसमोर उत्कृष्ठ खेळण्याचा जोर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–मेजर लीग सॉकरमध्ये सर्वात जलद 100 गोल करण्याचा विक्रम राईट-फिलीप्सच्या नावे
–फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचला झाला या गोष्टीचा पश्चाताप