आजपासून (14 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला वनडे सामना (1st ODI Match) वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), मुंबई (Mumbai) येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बुमराहच्या गोलंदाजीचा अनुभव सांगितला आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहसोबत (Jasprit Bumrah) सरावादरम्यानचा अनुभव सांगताना विराट म्हणाला की, “बुमराह मागील 4 वर्षांंपासून भारतीय संघासाठी खेळत आहे. ही दुसरी वेळ होती जेव्हा मी त्याच्याविरुद्ध नेट्समध्ये बाद झालो.”
“2018 मध्ये कसोटी सामन्याआधी पहिल्यांदा ऍडलेड येथे आणि आज बुमराहने मला बाद केले. मला आनंद आहे की तेव्हा नेट्समधील माझा शेवटचा चेंडू होता. कारण तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी तयार झाला होता. परंतु मी नेट्समधून बाहेर गेलो होतो,” असेही विराट यावेळी म्हणाला.
“माझ्या मते क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात बुमराह सर्वात चांगला गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध खेळताना, तो सामन्यात ज्याप्रकारे गोलंदाजी करतो, अगदी तसेच तो सरावादरम्यानही नेट्सवर गोलंदाजी करतो. तो नेहमी आमच्या डोक्याला चेंडू मारण्यात आणि बरगड्यांना निशाना बनवण्यास स्वत: ला रोखत नाही,” असे बुमराहच्या गोलंदाजीचा अनुभव सांगताना विराट म्हणाला.
“तो परिपूर्ण गोलंदाज आहे आणि नेट्सवर सरावादरम्यान सर्वोत्कृष्ट गोलंदाजाविरुद्ध खेळणे नेहमी चांगले असते. मी स्वत: ला बुमराहविरुद्ध चांगले खेळण्याचे आव्हान देतो. तुम्हाला दररोज बुमराहविरुद्ध खेळताना चौकार मारण्याची संधी मिळत नाही. आज मला ती संधी मिळाली याचा आनंद आहे.” असेही विराट यावेळी म्हणाला.
#TeamIndia Captain @imVkohli hit some boundaries off Bumrah's bowling in the nets today.
Hear what the Skipper has to say about the same 😅 pic.twitter.com/g81FTR5jRT
— BCCI (@BCCI) January 13, 2020
बुमराहने आतापर्यंत 58 वनडे सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 21.88 च्या सरासरीने 103 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिका हा संघ जिंकणार, रिकी पाँटिंगची मोठी भविष्यवाणी
वाचा👉https://t.co/UFiPwoHE2U👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsAUS @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020
निवृत्तीतून माघार घेतलेला हा खेळाडू तब्बल ३ वर्षांनंतर करतोय पुनरागमन https://t.co/t9vFmdHNjB#म #मराठी #Cricket
— Maha Sports (@Maha_Sports) January 13, 2020