प्रदीर्घ काळापासून दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या बुमराहची श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी टी20 आणि वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे.राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी त्याच्या तंदुरुस्तची चाचणी करण्यात येईल. त्यामुळे केरळविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात बुमराह गुजरात संघाकडून (25 डिंसेबरला) खेळणार होता.
रणजी ट्रॉफीमध्ये आजपासून गुजरात आणि केरळमध्ये सामना खेळला जात आहे. या सामन्याबद्दल बरीच चर्चा सुरू होती, कारण या सामन्यात जसप्रीत बुमराह गुजरातकडून खेळणार आहे अशा बातम्या समोर येत होत्या.
पण बुमराहला रणजी ट्रॉफी सामन्यात खेळू न देण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतला आहे. गांगुलीच्या या निर्णयाला बुमराहने मान्य केले असून, रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास नकार दिला आहे .
बुमराहने नुकत्याच वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या सराव सत्रात भाग घेतला होता.
बुमराहने आत्तापर्यंत 12 कसोटी सामन्यांमध्ये 19.24 सरासरीने 62 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच वनडे आणि टी20 मध्ये अनुक्रमे 103 आणि 51 विकेट्स घेतल्या आहेत.
बुमराहचे झाले कमबॅक; ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
वाचा👉https://t.co/ISxcTSVj6O👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi @MarathiRT @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019
श्रीलंकाविरुद्ध टी२० मालिकेआधी शिखर धवन खेळणार या संघाकडून
वाचा- 👉https://t.co/uSScH0XQYs👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi
@MarathiRT @BeyondMarathi #ShikharDhawan— Maha Sports (@Maha_Sports) December 24, 2019