काल (2 फेब्रुवारी) बे ओव्हल (Bay Oval), माउंट माउंगानुई (Mount Maunganui) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्याच्या टी20 मालिकेतील अंतिम सामना (Last Match Of 5 Matches T20 Series) पार पडला. या सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवत मालिका 5-0 अशा फरकाने जिंकली.
हा सामना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) खास होता. कारण 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 सामन्यातून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराहचा हा 50 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना (50th T20I Match) होता.
बुमराह हा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा भारताचा सातवा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा, एमएस धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन आणि युवराज सिंग या भारतीयांनी का कारनामा केला आहे.
बुमराहने 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात मिळून 59 विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे भारतीय –
108 – रोहित शर्मा
98 – एमएस धोनी
82 – विराट कोहली
78 – सुरेश रैना
61 – शिखर धवन
58 – युवराज सिंग
50 – जसप्रीत बुमराह
49 – रविंद्र जडेजा
पाचव्या टी२०मध्ये भारताला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त
वाचा👉https://t.co/kb9pRFp7f3👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020
चहल, अय्यर, दुबेसह डान्स करणारा तो खेळाडू नक्की आहे तरी कोण?
वाचा- 👉https://t.co/06GjyXWckw👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @yuzi_chahal @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020