महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने मा.श्री. आमदार गणपतशेठ काळू गायकवाड व नवतरुण मित्र मंडळ (रजि.) यांच्या सौजन्याने कै. अनिल महादेव कर्पे स्मृती प्रित्यर्थ श्री देवेंद्र फडणवीस चषक पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. दादासाहेब गायकवाड क्रीडांगण मराठा कोळशेवाडी, कल्याण पूर्व येथे दिनांक २६ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०१९ या कालावधीत सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा मातीच्या मैदानावर खेळवण्यात येणार असून एकूण ४ मैदाने तयार करण्यात येणार आहेत. कबड्डी रसिकांसाठी भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे.
स्पर्धेत पुरुषांचे १८ तर महिलांचे १८ संघ सहभागी होणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व नाशिक जिल्ह्यातील मातब्बर पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहेत.
पुरुष गटात अंकुर स्पोर्ट्स, विजय क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, ओम कल्याण, शिव शंकर, जय शिव यादी संघ तर महिला गटात शिवशक्ती, राजमाता जिजाई पुणे, महात्मा गांधी स्पोर्ट्स, संघर्ष, स्वराज्य, डॉ शिरोडकर स्पोर्ट्स यादी संघ यास्पर्धेत खेळणार आहेत.