टीम इंडियाने पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात इंग्लंडचा 150 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिका 4-1 ने जिंंकली आहे. या सामन्याचा नायक अभिषेक शर्मा ठरला. ज्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना धो धो धुतले. त्याने त्याच्या टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. ज्यात 135 धावा केल्या. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचे खूप कौतुक केले. सूर्यकुमारने सामन्यात अभिषेक आणि शिवम दुबे यांनाही गोलंदाजी करायला लावली. ज्यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीने सामन्यात तीन विकेट्स घेतल्या.
भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माचे कौतुक केले. ज्याने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले. त्याने संघाला 150 धावांनी मोठा विजय मिळवून मालिका जिंकण्यास मदत केली. सूर्यकुमार म्हणाला की त्याला या शैलीत फलंदाजी करताना पाहणे मजेदार होते. त्याने असेही म्हटले की त्याचे कुटुंबही इथे आहे आणि त्यांनाही खूप मजा आली असेल.
अभिषेक आणि दुबे यांना गोलंदाजी करण्याबद्दल सूर्यकुमार म्हणाला, ‘ही रणनीती नव्हती, तर मैदानावर लगेच निर्णय घेण्यात आला. कारण मला वाटले की ते विकेट घेऊ शकतात आणि त्यांनी ते करुन दाखवले’ ‘प्लेअर ऑफ द मॅच’ अभिषेकच्या 135 धावांच्या शतकाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘त्याची खेळी पाहणे मजेदार होते. त्याचे कुटुंबही इथे उपस्थित आहे आणि मला खात्री आहे की सर्वांना त्याची खेळी पाहण्याचा आनंद झाला असेल.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर सामना आणि मालिका गमावल्याने निराश दिसला होता. तो म्हणाला, ‘मालिका हरणे निराशाजनक आहे. आम्ही काही गोष्टी बरोबर केल्या, पण काही बाबींमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. आमचा प्रयत्न सतत सुधारणा करण्याचा आहे. मार्क वूड आणि ब्रायडन कार्स यांनी चांगली गोलंदाजी केली. आता आम्हाला एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करायची आहे. अभिषेकने खूप चांगली फलंदाजी केली.
हेही वाचा-
भारत तर सोडा इंग्लंड संघ एकट्या अभिषेक शर्माकडून हरला, पाहा आकडेवारी
IND vs ENG: वानखेडेवर विक्रमांची मालिका, टीम इंडियाचा इंग्लंडला दे धक्का…..
विक्रमी शतक ठोकणारा अभिषेक ठरला सामनावीर, या खेळाडूने जिंकला मालिकावीरचा किताब