---Advertisement---

SRH vs CSK: हैदराबादच्या गोलंदाजीसमोर चेन्नई संघ ढेपाळला! हैदराबादसमोर 155 धावांचे आव्हान

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 43वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद (CSK vs SRH) संघात खेळला जात आहे. दरम्यान दोन्ही संघ चेपाॅक स्टेडियमवर आमने-सामने आहेत. या सामन्याचा टाॅस जिंकून हैदराबादने चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. दरम्यान चेन्नईचा संघ 154 धावांवरतीच ऑल आऊट झाला. आता हैदराबादसमोर जिंकण्यासाठी 155 धावांचे आव्हान आहे.

चेन्नईसाठी शेख रसीद आणि युवा 17 वर्षीय आयुष म्हात्रे यांनी डावाची सुरूवात केली. पण शेख रसीद मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण युवा प्रतिभावान आयुष म्हात्रेने चमकदार कामगिरी केली. त्याने 19 चेंडूत 30 धावा केल्या. दरम्यान त्याने आपल्या खेळीत 6 चौकार मारले. चेन्नईसाठी डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक धावा केल्या. तो 42 धावावर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 उत्तुंग षटकारांसह 1 चौकार मारला. दीपक हुडा 22 आणि रवींद्र जडेजा 21 धावा यांच्या जोरावर चेन्नईचा संघ 154 धावांवरती पोहोचू शकला. हे खेळाडू वगळता दुसरा कोणताही फलंदाज चेन्नईसाठी दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

हैदराबादसाठी मध्यमगती वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार पॅट कमिन्स आणि जयदेव उनादकट यानी प्रत्येकी 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या, तर मोहम्मद शमी आणि कामिंदू मेंडिस यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी

चेन्नई सुपर किंग्ज- शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), दीपक हुडा, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---