---Advertisement---

CSK vs KKR: चेन्नईने केकेआरला जिंकण्यासाठी दिलं 104 धावांचं आव्हान

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 25 वा सामना आज (11एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला जात आहे. कोलकाता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच चेन्नईला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत फक्त 103 धावा केल्या आहेत. तसेच आता कोलकाता संघाला जिंकण्यासाठी फक्त 104 धावांचं आव्हान दिलेलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई ची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. कर्णधार ऋतुराज गायकवाड नसल्यामुळे चेन्नईला खूप मोठे नुकसान भरावे लागणार आहे. ऋतुराची कमी चेन्नईला खूप भासत आहे.

चेन्नईसाठी कोणत्याच फलंदाजाने प्रभावी कामगिरी केली नाही. महेंद्रसिंग धोनी अवघ्या 1 धावांवर बाद झाला. शिवम दुबेने 31 धावा केल्या. विजय शंकरने 29 धावा केल्या. रचिन रवींद्र 4, डेवॉन कॉन्वे 12, राहुल त्रिपाठी 16, अशा धावसंख्येवर हे फलंदाज बाद झाले. चेन्नई संघाची आयपीएलच्या इतिहासातील ही पहिली त्यांच्या घरच्या मैदानावर ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

केकेआर संघाने शानदार गोलंदाजी करत चेन्नईला जास्त धावा करू दिल्या नाहीत. केकेआरसाठी सुनील नारायण ने सर्वाधिक विकेट्स घेतल्या त्याने चार षटकात फक्त 13 धावा देत तीन विकेट्स पटकावल्या. तसेच वरून चक्रवर्तीने 2, हर्षित राणाने 2 विकेट्स घेतल्या.

चेन्नईने या हंगामात पाच सामन्यांमधील चार सामने आधीच गमावले आहेत. तसेच दोन सामने त्यांनी त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजे चेपॉकच्या मैदानावर गमावले आहेत. तसेच कोलकाताने देखील मागच्या सामन्यात पराभव पत्करला होता. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---