भारताचा कसोटी क्रिकेटमधील पूर्णवेळ यष्टिरक्षक वृद्धिमान सहाने माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावरील मौन सोडले असून अनिल कुंबळे हे कठोर प्रशिक्षक नसल्याचं म्हटलं आहे.
वृद्धिमान सहा म्हणतो, ” मला अनिल कुंबळे एक कठोर प्रशिक्षक नक्की नाहीत. त्यांना काही गोष्टीत कठोर निर्णय घ्यावे लागत असत. काही लोकांना ते कठोर वाटतात तर काहींना नाही. परंतु अनिल भाई मला तसे कधीच वाटले नाही. ”
अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्या कार्यशैलीतील फरक:
यावर भाष्य करताना सहा म्हणतो, ” अनिल भाईंना नेहमी मोठी धावसंख्या उभारावी असे वाटत असे. ४००,५०० आणि ६०० धावा केल्यावर पुढच्या संघाला १५०-२०० मध्ये बाद करावे असे त्यांना वाटे. जे नेहमी शक्य नव्हते. ”
“दुसऱ्या बाजूला रवी शास्त्री यांना समोर संघाला एकहाती पराभूत करावे असे वाटते. खेळायला जाऊन तुमच्या कामगिरीने समोरच्या संघाला चिरडून टाका. हाच एक मुख्य फरक मी त्यांच्यात पहिला. बाकी दोघेही चांगलेच सकारात्मक आहे. जेव्हा रवी शास्त्री डायरेक्टर होते तेव्हा ते जास्त आक्रमक होते. परंतु नवीन भूमिकेत ते जरा जास्तच सहभागी होऊन काम करतात. ”
कर्णधार विराट कोहलीबद्दल
विराट कोहलीच्या कामगिरीवर प्रभावित असणारा सहा म्हणतो, “तो काळाप्रमाणे सतत बदलत आहे. तो बऱ्याच गोष्टीत खेळाडूंना बरोबर घेऊन चालतो. आम्ही बऱ्याच वेळा जेवण आणि फिरायला बरोबर जातो. तो सतत आमच्याबरोबर चेष्टा करत असतो. हा एक चांगला गुण विराटमध्ये आहे. “