क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे 17 वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूण काम पाहिलेले जेम्स सदरलॅंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची आज पत्रकार परीषदेत घोषणा केली.
जेम्स सदरलॅंड यांनी 2001 मधे मॅल्कम स्पीड यांचा ऊत्तराधिकारी म्हणूण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारला होता.
गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी मानधनाच्या कारणावरून झालेला वाद आणि मार्च महिन्यातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी केलेले बॉल ट़ॅम्परींग प्रकरण सोडले तर जेम्स सदरलॅंड यांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलिय महिला व पुरषांच्या संघाची कामगीरी सर्वोत्तम राहीली आहे.
जेम्स सदरलॅंड क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड होईपर्यंत पदावर कायम राहणार आहेत.
जेम्स सदरलॅंड यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचा संबंध बॉल ट़ॅम्परींग प्रकरणाशी जोडला जात आहे. पण सदरलॅंड यांनी पत्रकार परिषदेत त्याच्या राजीनाम्याचा बॉल ट़ॅम्परींग प्रकरणाशी कोणताही संबध नाही असे स्पष्ट केले.
मार्च महिन्यात कर्णधार स्टिव स्मिथ, डेविड वार्नर, कॅमेराॅन ब्रॅनक्राॅफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली होती तसेच प्रशिक्षक डेरन लेहमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.