क्रिकेट जगतात स्टेन गन या नावाने प्रसिद्ध असेलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर निवृत्त होणार आहे.
याबाबlची माहिती स्वत: डेल स्टेनने एका कार्यक्रमात बोलताना दिली.
“मी इंग्लंडमध्ये होत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र मी विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेट खेळू शकेल असे मला वाटत नाही.” असे डेल स्टेन त्याच्या निवृत्ती बाबत बोलताना म्हणाला.
डेल स्टेन गेल्या दोन वर्षापासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. असे असले तरी त्याला आशा आहे आहे की, अनुभवाच्या जोरावर त्याची एकदिवसीय विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात निवड होईल.
“मला असे वाटते की, माझ्या क्रिकेटमधील अनुभवच्या जोरावर मला विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघात स्थान मिळेल. या विश्वचषकानंतर मी माझ्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे. मात्र मी कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.” आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या भविष्याबाबत बोलताना डेल स्टेन म्हणाला.
३५ वर्षीय डेल स्टेनने ११६ एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामध्ये त्याने २६.६३ च्या सरासरीने १८० बळी मिळवले आहेत.
तर ८८ कसोटी सामन्यात २२.६४ च्या सरासरीने ४२१ बळी मिळवले आहेत
महत्त्वाच्या बातम्या-
-वाचा- कोहली, धोनी आणि सचिनमध्ये कोण ठरले सर्वाधिक लोकप्रिय?
-इम्रान खानच काय, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफदेखील खेळायचे क्रिकेट