भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने भारत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला 2-1 अशा फरकाने पराभूत करेल अशी भविष्यवाणी केली आहे.
तसेच इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील खेळाडूंकडे इंग्लंडला इंग्लंडमध्ये पराभूत करण्याची प्रतिभा आणि धमक आहे. असे मत एका कार्यक्रमात बोलताना राहुल द्रविडने व्यक्त केले.
“तुम्ही जितक्या लवकर इंग्लंडमधील परिस्थितींशी जुळवून घ्याल तितका जास्त लाभ तुम्हाला होतो. आम्ही 2007 साली इंग्लंडमध्ये 3 तीन सामन्यांची मालिका खेळलो होतो. त्यावेळी जर आम्ही कसोटी मालिकेची खराब सुरवात केली असती तर आम्हाला पुढे पुनरागमन करने अवघड गेले असते. मात्र 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत तुम्हाला खराब कामगिरीनंतरही मालिकेत पुनरागमन करण्याची संधी असते.” असे द्रविड म्हणाला.
“मला वाटते या कसोटी मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने विजय मिळवेल. सध्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांकडे एका सामन्यात 20 विकेट मिळवण्याची धमक आहे. तसेच फलंदाजीतही भारतीय संघ भक्कम आहे त्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका चुरशीची होणार आहे.” असे राहुल द्रविड म्हणाला.
2007 साली भारतीय संघाने राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवला होता. तसेच राहुल द्रविड इंग्लंडमध्ये अजित वाडेकर आणि कपिल देव यांंच्यानंतर कसोटी मालिका जिंकणारा तिसरा कर्णधार ठरला होता.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तीन दिग्गज भारतीय माजी क्रिकेटपटू इम्रान खानच्या शपथ विधीला लावणार हजेरी
–पहिल्या सामन्यातच दडलाय भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल