नवी दिल्ली | भारताचा सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरला डीडीसीएच्या क्रिकेट संबधी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आल्याची माहिती डीडीसीएचे सेक्रेटरी विनोद तिहारा यांनी दिली.
गेल्या वर्षी गौतम गंभीरला सरकारने डीडीसीएमध्ये सरकारचा प्रतिनिधी म्हणुन नियुक्त केले होते.
मात्र न्यायालयाद्वारे नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती विक्रमजीत सेन यांच्या प्रशासकीय समितीने गेले एक वर्ष सातत्याने गंभीरच्या डीडीसीएतील समावेशावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले होते.
काल जाहीर झालेल्या डीडीसीएच्या निवडणूक निकालात पत्रकार रजत शर्मांच्या पॅनेलने माजी क्रिकेटपटू मदन लाल यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत ही निवडणूक जिंकली.
”या निवडणूकीत विजयी झालेले डीडीसीएचे सदस्य व्यवस्थापना संबधी काम बघतील. मात्र क्रिकेट संबधी सर्व निर्णय घेण्याचे अधिकार गौतम गंभीरकडे असतील.” असे डीडीसीएच्या सेक्रेटरी पदी निवड झालेले विनोद तिहारा म्हणाले.
दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेल्या गौतम गंभीरचे दिल्लीच्या क्रिकेट क्षेत्रात आणि डीडीसीएमध्ये मोठे वजन आहे.
२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावणारा गौतम गंभीर गेल्या पाच-सहा वर्षांपासून भारतीय संघाबाहेर आहे.
अशी आहे गौतम गंभीरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी-
गौतम गंभीरने भारताकडून ५८ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये गंभीरने ४१.९६ च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या आहेत.
तसेच १४७ एकदिवसीय सामन्यात गौतम गंभीरने ३९.६८ च्या सरासरीने ५२३८ धावा केल्या आहेत.
३७ टी-२० सामन्यात त्याने २७.४१ च्या सरासरीने ९३७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-कर्णधार कोहली म्हणतो, आम्हाला कमी समजणं इंग्लंडला महागात पडू शकत
-होय, किंग कोहलीला साहेब घाबरले आहेत…