रविवारी (22 डिसेंबर) बाराबती, कटक (Barabati, Cuttack) येथे भारत आणि वेस्ट इंडीज (India vs Windies) संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना पार पडणार आहे. हा भारत आणि वेस्ट इंडिजचा 2019 या वर्षातील शेवटचा वनडे सामना आहे.
त्यामुळे या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज शाय होप यांच्यात 2019 मध्ये सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज ठरण्यासाठी शर्यत पहायला मिळणार आहे.
सध्या 2019 मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. त्याने 27 सामन्यात 1427 धावा केल्या आहेत. तर त्याच्यापाठोपाठ 1303 धावांसह शाय होप आहे आणि विराट 1292 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रोहित होप आणि विराटपेक्षा जवळजवळ 120 धावांपेक्षा अधिक धावांच्या आंतराने पुढे असल्याने त्याला मागे टाकण्यासाठी होप आणि विराटला मोठी शतकी खेळी करावी लागणार आहे.
रोहित आणि होप हे दोघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मात्र विराटला या मालिकेत आत्तापर्यंत केवळ 4 धावा करता आल्या आहेत. त्यामुळे आता 2019मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करण्याची शर्यत कोण जिंकणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. परंतु, विंडीजविरूद्ध जर त्याला चांगली कामगिरी करता आली नाही तर सलग तिसऱ्यांदा त्याला अशी कामगिरी करण्याची संधी गमवावी लागेल.
रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटने वनडे क्रिकेटमध्ये 2017ला 1460 धावा केल्या आहेत. तर 2018 मध्ये त्याने 1202 धावा फटकावल्या होत्या.
धोनीनंतर आता कॅप्टन कोहलीलाही 'तो' खास विक्रम करण्याची संधी
वाचा- 👉https://t.co/AI5oi6FN4T👈#म #मराठी #Cricket #record @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019
चायनामन गोलंदाज कुलदीपला आज ही खास सेंचूरी पूर्ण करताच इतिहास घडवण्याची संधी
वाचा- 👉https://t.co/aLusGYI1mN👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi
@MarathiRT #INDvWI #kuldeepyadav— Maha Sports (@Maha_Sports) December 22, 2019