रिषभ पंत हा मोठ्या काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. पंतने आपला शेवटचा सामना 2022मध्ये खेळला होता. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या अपघातामुळे बरेच दिवस तो क्रिकेट खेळू शकला नाहीये. आता तो आगामी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असातच भारताच्या एका दिग्गज खेळाडूने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल 2024 मध्ये रिषभ पंत (rishabh pant) खेळणार असे वाटत आहे. तसेच जर त्याचे प्रदर्शन चांगले झाले तर त्याला आगामी टी20 विश्वचषकसाठी संघात स्थान द्यावे अशी चर्चा होत आहे. परंतु माजी भारतीय वेगवान गोलंदाज जहीर खान(jahir khan) यांनी वेगळचं मत मांडले आहे. दरम्यान पतंचा डिसेंबर 2022मध्ये अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. पण असा अंदाज वर्तवला जात आहे की, आगामी आईपीएल(IPL) हंगामात खेळताना दिसेल. आईपीएलमध्ये तो दिल्ली कॅपीटल संघाचा (DC) कर्णधार आहे. यादरम्यान तो यष्टीरक्षक म्हणून खेळणार का नाही असे काही सांगितले जाऊ शकत नाही.
जहीर खानची ऋषभ पंत बद्दल प्रतिक्रिया
माध्यमाशी बोलताना जहीरला प्रश्न विचारण्यात आला की, पंतने जर आईपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले तर त्याला टी20 विश्वचषकात स्थान दिले जाईल का? या प्रश्नावर जहीरने उत्तर देत असे म्हणला की, “मला असे वाटत नाही की, आगामी टी20 विश्वचषकासाठी(T20) भारत डावखुऱ्या फलंदाजाच्या शोधात आहे. आपण जर त्याच्या इतपर्यंतचा प्रवास पाहिला, तर तो कोणत्याही खेळाडूसाठी सोपा नाही. जर तो खेळण्यासाठी आला तर त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. सर्वप्रथम त्याला लवकर पुनरागमन केले पाहिजे आणि खेळायला पाहिजे. त्याने लय मिळवले पाहिजे. या सर्व गोष्टींना वेळ लागेल. या सर्व बाबी लक्षात घेऊन आईपीएलमध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले. तरी संघ या पद्धतीने विचार करतोय, असे मला नाही वाटत.”
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या भावाला आधी मारला खणखणीत षटकार, पुढे मिठी मारत इरफानने असे केले सेलीब्रेशन
Australian Open 2024 : सुमितने ऑस्ट्रेलियात गाजवले मैदान, तब्बल 35 वर्षांनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय