---Advertisement---

आता हे काय मध्येच! वॉर्नर भारताविरुद्धच्या सामन्यातून होणार बाहेर? पण कॅप्टनला नाही कसलीच चिंता

David-Warner
---Advertisement---

यावर्षी म्हणजेच 2022मध्ये खेळला जाणारा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेचे यजमानपद साकारणारा ऑस्ट्रेलिया संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने  2021मध्ये खेळण्यात आलेला टी20 विश्वचषकही जिंकला होता. सध्या टी20 विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी संघांना वॉर्म-अप सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाचाही एक वॉर्म- अप सामना भारताविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच संघाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याला विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, यामागील कारण काय आहे? चला जाणून घेऊया…

डेविड वॉर्नर याला विश्रांती देण्यामागील कारण?
डावखुरा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) याला मानेची समस्या असल्याचे बोलले जात आहे. त्याला नुकतेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बुधवारी (दि. 12 ऑक्टोबर) क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. मात्र, दुखापतग्रस्त होऊनही त्याने फलंदाजी केली होती. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी कॅनबेरा येथे गोल्फ खेळतानाही दिसला. मात्र, शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) त्याला मानेमध्ये त्रास जाणवत असल्याने तो मालिकेचा शेवटचा सामना खेळू शकला नव्हता.

असे असले, तरीही वॉर्नर सोमवारी (दि. 17 ऑक्टोबर) भारताविरुद्धच्या वॉर्म- अप सामन्यात खेळावे की नाही, याबाबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याला कोणतीही चिंता नाहीये. त्याने विश्वास व्यक्त केला आहे की, वॉर्नर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी डावाची सुरुवात करताना दिसेल.

काय म्हणाला फिंच?
फिंच म्हणाला की, “मला वाटते की, तो निश्चितरीत्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी बरा होईल. मला भारताविरुद्धच्या सराव सामन्याबाबत खात्री नाहीये. मला वाटते की, डोक्याला दुखापत होण्याच्या दुसऱ्या दिवशी तो ठीक होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला मानेचा त्रास होऊ लागला. आम्ही प्रतीक्षा करू आणि पाहू की, तो कसा आहे. तो तंदुरुस्त असेल, तर तो खेळेल. जर त्याला अजूनही त्रास होत असेल, तर आम्ही सावधगिरी चूक करी. मला वाटते की, जेव्हा तुमच्याकडे अनुभवी खेळाडू असतो, ज्याला माहिती आहे की, स्पर्धेसाठी तयार होण्यासाठी त्याला काय करण्याची आवश्यकता आहे, तेव्हा तुम्ही या गोष्टीची चिंता केली नाही पाहिजे की, तो खेळतो की नाही.”

ऑस्ट्रेलिया संघ टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीच्या पहिल्या गटात आहे. या गटात ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आहे. दुसरीकडे, दोन संघ पहिला राऊंड खेळल्यानंतर सामील होतील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 विश्वचषकात ‘या’ तिघांचे प्रदर्शन विसरता येणार नाही, एका हंगामात केल्यात सर्वाधिक धावा
जरा इकडं पाहा! पाकिस्तानी पठ्ठ्यासोबत परदेशी चाहतीला करायचंय लग्न, क्रिकेटपटूवर लागलेत गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---