---Advertisement---

‘पाजी तुमच्याकडूनच तर शिकलोय…’, माजी विस्फोटक फलंदाज सेहवागने कौतुक करताच शार्दुलचे मन जिंकणारे उत्तर

Shardul-Thakur-And-Virender-Sehwag
---Advertisement---

शार्दुल ठाकूर याच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध 81 धावांनी विजय साकारला. हा केकेआरचा आयपीएल 2023 स्पर्धेतील पहिला विजय ठरला. या सामन्यात शार्दुलच्या खेळीच्या जोरावर केकेआरला 200 धावांचा टप्पा पार करण्यात मदत झाली. या सामन्यानंतर शार्दुलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, शार्दुलच्या खेळीवर भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग हादेखील फिदा झाला. सेहवाग याने ट्वीट करत शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंग यांची प्रशंसा केली. यानंतर शार्दुलनेही सेहवागला खास रिप्लाय देत सर्वांचे लक्ष वेधले.

Paisa-Pani

काय म्हणाला सेहवाग?
वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केले. यामध्ये त्याने शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि रिंकू सिंग (Rinku Singh) याचे कौतुक केले. सेहवागने ट्वीट करत लिहिले की, “लॉर्ड शार्दुल, लॉर्ड रिंकू. जबरदस्त क्लीन हिटिंग.” सेहवागच्या या ट्वीटनंतर शार्दुलनेही प्रतिक्रिया दिली.

https://twitter.com/virendersehwag/status/1644003984401657859?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1644003984401657859%7Ctwgr%5Ed96c5af2674aeccf75cf3e76e14f7284139f9028%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.cricketcountry.com%2Fhi%2Fnews%2Fshardul-thakur-reacts-on-virender-sehwag-tweet-praising-him-and-rinku-singh-1080130

आयपीएलने शेअर केलेल्या रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याने शार्दुलला विचारले की, महान फलंदाज सेहवागने तुझी प्रशंसा केली आहे. यावर तू काय म्हणशील? यावेळी शार्दुल ठाकूर याने ईडन गार्डन्समध्ये विजयानंतर गुरबाजसोबत बोलताना म्हटले की, “पाजी तुमच्याकडूनच तर शिकलोय. तुमच्यापेक्षा चांगले वेगवान गोलंदाजांना कोण मारतं? आम्ही तर पाहून पाहून शिकलोय.”

दुसरीकडे, गुरबाज याने आयपीएलमध्ये पहिले अर्धशतक झळकावले. तसेच, तो आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा पहिलाच अफगाणिस्तानी फलंदाज ठरला. तो म्हणाला की, “इतक्या प्रेक्षकांमध्ये खेळण्याचा अनुभवच वेगळा आहे. क्रिकेट सोपे नाहीये.”

शार्दुलने त्याला विचारले की, त्याला केकेआरचा सहमालक आणि ‘पठाण’ शाहरुख खान (Shahrukh Khan) यांना भेटून कसे वाटले? यावर गुरबाज म्हणाला की, “मी दीर्घ काळापासून त्यांचा चाहता आहे आणि त्यांना भेटायचे होते. आज त्यांना भेटून माझी इच्छा पूर्ण झाली. त्यांच्यासमोर अर्धशतक करणे आणि संघाच्या विजयात योगदान देऊन चांगले वाटले.”

सामन्याबाबत बोलायचं झालं, तर कोलकाता संघाला कर्ण शर्माने डावातील 12व्या षटकात संकटात टाकले होते. त्याने सलग 2 चेंडूवर गुरबाज (57) आणि आंद्रे रसेल यांना बाद करत कोलकाताची धावसंख्या 5 बाद 89 धावा केली होती. इथून पुढे कोलकाताला मोठी धावसंख्या करणे सोपे नव्हते. त्यानंतर रिंकू सिंग आणि शार्दुल ठाकूर यांनी सहाव्या विकेटसाठी 7.3 अवघ्या षटकात 103 धावांची भागीदारी रचली. रिंकूने यावेळी 33 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार 46 धावा केल्या. तसेच, शार्दुल ठाकूर याने फक्त 20 चेंडूत अर्धशतक केले. त्याने 29 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी साकारली.

शार्दुलने केलेली धावसंख्या ही आयपीएल इतिहासात सातव्या क्रमांकावरील फलंदाजाने केलेली दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी रसेलने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 2018मध्ये 88 धावा केल्या होत्या.

यावेळी केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 204 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करतान बेंगलोरला 17.4 षटकात 10 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. (cricketer shardul thakur reacts on virender sehwag tweet praising him and rinku singh)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लय भारी! 2018नंतर KKRच्या खास चाहत्याला भेटला शाहरुख, पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ
विजयानंतर KKRची गरुडझेप! पॉइंट्स टेबलमध्ये RCBला जबर धक्का, तिसऱ्या स्थानावरून थेट ‘या’ स्थानी घसरण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---