काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये पार पडला. या हंगामाचे विजेेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकले. आता हा हंगाम संपून दोन महिने होत आहेत आणि आता १४ व्या आयपीएल हंगामाचे बिगुलही वाजले आहेत. बुधवारी सर्व आयपीएलमधील सहभागी फ्रँचायझींनी त्यांच्या संघात कायम केलेल्या आणि संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
तीन वेळच्या चेन्नई सुपर किंग्सने मुरली विजय, हरभजन सिंग, पियुष चावला, केदार जाधव आणि मोनू सिंग यांना मुक्त केले आहे. याशिवाय शेन वॉट्सन निवृत्त झाल्याने तो देखील मुक्त होणारा ६ वा खेळाडू आहे.
तसेच संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंमध्ये एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा, ऋतराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन यांचा समावेश आहे.
According to Leo, #Yellove finish with SIX and bid adieu emotions, coming soon! #StayTuned 🦁💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) January 20, 2021
Thank you for all the #Yellove outings, Bhajju pa! Keep spreading the Pulamai, everywhere you go! #WhistlePodu 💛🦁@harbhajan_singh pic.twitter.com/J4xu8dnVZ8

चेन्नई सुपर किंग्ससाठी २०२० चा आयपीएल हंगाम खास ठरला नव्हता. त्यांना १४ सामन्यातील केवळ ६ सामने जिंकता आले होते. त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले होते. यानंतर २०२१ च्या आयपीएल हंगामासाठी संघात अनेक मोठे बदल होतील, याची सर्वांनीच अपेक्षा केली होती.