आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने दोन वर्षांनी शानदार पुनरागमन करत आयपीएलचे तिसरे विजेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबादचा पराभव करत हे विजेतेपद मिळवले.
या संघाने आत्तापर्यंत खेळलेल्या 9 आयपीएल मोसमांपैकी 7 वेळा अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. याच 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईने विजेतेपद मिळवले आहे. तसेच 2010 आणि 2014 मध्ये चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले आहे.
या प्रवासाची आठवण म्हणून चेन्नईच्या संघाचा व्यवस्थापक रसल राधाकृष्णनने चेन्नई संघाचा लोगो आणि विजेतेपदाची वर्षाचा टॅटू बनवुन घेतला आहे.
त्याचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना लिहिले आहे की “माझ्या नविन टॅटूबद्दल मला फार आनंद झाला आहे. सीएसके कायमच माझ्या हृदयाच्या जवळ आहे.”
Finally so pleased about my new tattoo,CSK always close to my heart #Yellove #WhistlePodu pic.twitter.com/AedAzrCQJb
— Russell (@russcsk) June 8, 2018
चेन्नईवर 2016 आणि 2017 च्या आयपीएल मोसमासाठी फिक्सिंग प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी यावर्षी आयपीएलमध्ये पूनरागमन केले आहे. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत चेन्नई आणि मुंबई संघाने सर्वाधिक 3 वेळा विजेतेपद मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
–फिटनेसच्या कारणावरुन मोहम्मद शमीला भारतीय संघातून वगळले, या खेळाडूला मिळाली संधी!
–291 कसोटी सामने आणि 33 वर्षांनंतर विंडिज संघाने केला हा कारनामा!
–सेहवागने षटकार मारण्यासाठी पाकिस्तानच्या कर्णधाराला बदलायला लावले क्षेत्ररक्षण!
–२१ वर्षीय क्रिकेटपटूचा सरावादरम्यान दुर्दैवी मृत्यु
–तो एक ट्विट रशीद खानला पडला भलताच महाग