मुंबई | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात होणार आहे. शेषराव वानखेडे स्टेडीअम, मुंबई येथे आज उद्धाटन समारंभानंतर एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स या संघात सलामीचा सामना होणार आहे.
आजपर्यंत हे दोन संघ तब्बल २२ सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यात मुंबई इंडियन्सने १२ तर चेन्नई सुपर किंग्जने १० सामने जिंकले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज एक मुंबई इंडियन्स सोडली तर कुणाविरुद्धही ५०% पेक्षा अधिक सामने पराभूत झाली नाही. चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स सोडून सर्व संघाविरुद्ध विजय हे पराभवांपेक्षा जास्त आहे.
२०१३ ते २०१७ या पाच वर्षाच्या काळात मुंबईने तिनदा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे, तर २०१० मध्ये हा संघ उपविजेता राहिला होता.
कधी होईल आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या संघांमध्ये आयपीएल २०१८ चा सलामीचा सामना आज, ७ एप्रिलला होणार आहे.
कुठे होईल आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजचा सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होईल. तसेच या मैदानावर मुंबईचे सर्व घरचे सामने होणार आहेत.
किती वाजता सुरु होणार आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना आज रात्री ८.०० वाजता सुरु होईल. तसेच या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ७.३० वाजता होईल.
कोणत्या टीव्ही चॅनेलवरून आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना प्रसारित होईल?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ एचडी या चॅनल्सवरून इंग्लिश समालोचनासह प्रसारित होईल. तसेच स्टार स्पोर्ट्स १ हिंदी , स्टार स्पोर्ट्स १ हिंदी एचडी यावरून हिंदी समालोचनासह हा सामना प्रसारित होईल.
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
आयपीएल २०१८ मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे ऑनलाईन प्रसारण हॉटस्टार आणि जिओ टीव्हीवर होणार आहे.
यातून निवडले जातील ११ जणांचे संघ:
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या,जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, मुस्तफिजूर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, ईशान किशन, एव्हिन लेविस, सौरभ तिवारी, आदित्य तारे, शरद लुम्बा, सिद्धेश लाड, जेसन बेहरेनडॉर्फ, बेन कटिंग, अनुकूल रॉय, तेजिंदर सिंग, अकीला धनंजया, राहुल चाहर, मयांक मार्कंडे, मोहसीन खान, प्रदीप सांगवान, एमडी निधीश, जेपी ड्युमिनी
चेन्नई सुपर किंग्स : एम एस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, फाफ डू प्लेसिस, ड्वेन ब्रावो, केदार जाधव,शेन वॉटसन, आंबती रायडू, इम्रान ताहीर,कर्ण शर्मा,एन जगदीसन, मुरली विजय,सॅम बिलिंग्स, शार्दूल ठाकूर, लुंगी एन्गिडी,मोनू सिंग कुमार, केएम असिफ, मार्क वूड, दीपक चाहर, कनिष्क सेठ, ध्रुव शोरे, क्षितिज शर्मा,चैतन्य बिष्णोई