पुणे । महिलादिनाचे औचित्य साधून ज्ञानसागर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च,सीएम इंटरनॅशनल स्कुल व ज्ञानसागर आर्टस अॅन्ड कॉमर्स कॉलेज,बालेवाडी यांच्या तर्फे 11 मार्च रोजी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायक्लोथॉन सर्व वयोगटांसाठी खुली आहे.याची सुरूवात बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस येथे 6 वाजता होणार असून सायक्लोथॉनचा समारोप येथेच होईल.
हा उपक्रम 5 किमी,8 किमी व 15 किमी या प्रकारात होईल.
सायक्लोथॉन हा उपक्रम या संस्थेमध्ये आयोजित अनेक उपक्रमांपैकी एक आहे.याआधी सेल्फ डिफेन्स टेक्निक्स,हेल्दी लिव्हिंग फॉर वुमन इत्यादी कार्यशाळांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांद्वारे स्ट्राँग वुमन,स्ट्राँग नेशन हा संदेश दिला जात आहे.
नोंदणीसाठी संपर्क : 7767800406/dimr.edu.in/cyclothon