पुणे | डूईट स्पोर्टस मॅनेजमेंटची फ्रँचायझी असलेल्या दबंग स्मॅशर्स टेबल टेनिस क्लब आता 2018 चा सीझन खेळण्यासाठी सज्ज झाला असून जगातील सर्वोत्कृष्ट टेबल टेनिस खेळाडूंचा यांत समावेश असणार आहे. स्मॅशर्सला अत्यंत अभिमान वाटत आहे की,जगातील पुरूष गटात अव्वल क्रमांकावर असलेल्या साथियान ज्ञानासेकरनची 2018 युटीटी मौसमाकरिता कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. फ्रँचायझीला संपूर्णपणे विश्वास आहे की,साथियान या कौशल्यवान संघाला नेतृत्व करेल व स्मॅशर्सला यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल.
साथियान कर्णधारपदाबरोबरच भारताची महिला गटातील अव्वल खेळाडू मनिका बात्रा व जपानच्या योशिदा मसाकी व सकुरा मोरी यांचा समावेश आहे. तसेच, याबरोबरच युवा खेळाडूंमध्ये भारताची अर्चना कामथ आणि सनिश आंबेकर, पोर्तो रिकोचा अॅड्रीयना डियाज, बेल्जियनमधील अव्वल स्थानी असलेला खेळाडू सेड्रीक न्युटींक यांचा समावेश असणार आहे. या संघाला प्रशिक्षक म्हणून सचिन शेट्टी आणि रोमानियन प्रशिक्षक अँड्रीया फिलीमॉन असणार आहेत.या दोघांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे.
याप्रसंगी बोलताना साथियान ज्ञानासेकरन म्हणाले की, इतक्या गुणवान खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व करायला मिळणे हा माझ्यासाठी एक बहुमानच आहे. मी खरोखरच या मौसमात दबंग स्मॅशर्स टीटीसी संघाचे नेतृत्व करण्यासाठी अतिशय उत्सुक असून यंदाच्या मौसमात विजेतेपद मिळविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे आणि आम्ही त्यात यशस्वी होऊ असा मला विश्वास वाटतो. या संघात विजेतेपदापर्यंत पोहचण्यापर्यंत योग्य खेळाडू आहेत आणि ते मानसिकतेच्या आघाडीवरही सक्षम आहेत.
दबंग स्मॅशर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या खेतान म्हणाले की, साथियन हा आमच्यासाठी कर्णधारपदाची निवड करताना सर्वात स्वाभाविक असा पर्याय होता. त्याच्याकडे असलेला अनुभव आमच्यासाठी फायद्याचा ठरेल आणि तो देशांतील सर्वोत्तम खेळाडू आहे. हा संघ आम्हांला विजेतेपदापर्यंत घेऊन जाईल, असा आम्हांला विश्वास वाटतो. दबंग स्मॅशर्स संघात एकाहून एक असे प्रतिभाशाली खेळाडू असून तो या लीगमधील सर्वात तरूण खेळाडूंचा संघही आहे. त्यामुळे टेबलटेनिस प्रेमींसाठी या संघाचा खेळ पाहणे हा एक आनंददायक क्षण ठरेल.