जगातील सर्वात लोकप्रिय टी२० स्पर्धा म्हणून आयपीएल स्पर्धेने नावलौकिक मिळवला आहे. या स्पर्धेत भाग घेणे हे अनेक खेळाडूंचे स्वप्न असते. मात्र काही दिवसांपुर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आयपीएलच्या येत्या १४ व्या हंगामात सहभागी होणार नसल्याची माहिती दिली होती. पण आता असे वृत्त पुढे येत आहे की, स्टेन पाकिस्तान सुपर लीगच्या (पीसीएल) सहाव्या हंगामात खेळताना दिसणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मंगळवारी (०५ जानेवारी) पीसीएल २०२१ साठी २५ परदेशी खेळाडूंची कच्ची यादी जाहीर केली आहे. यात ‘स्टेनगन’ म्हणून ओळखला जाणाऱ्या डेल स्टेनचे नाव आहे. त्याच्याव्यतिरिक्त राशिद खान आणि ख्रिस गेल या टी२० स्पेशलिस्ट क्रिकेटपटूंचाही यात समावेश आहे.
पीसीबीने जाहीर केलेल्या परदेशी खेळाडूंच्या यादीत स्टेन, राशिद आणि गेल यांची नावे प्लॅटिनम कॅटेगरीत ठेवण्यात आली आहेत. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इमाद वसीम आणि मोहम्मद आमिर यांनाही स्थान देण्यात आले आहे. सोबतच पीसीबीने अशी माहिती दिली आहे की, वरच्या फळीतील टी२० फलंदाज डेविड मलान, ड्वेन ब्रावो, ख्रिस लिन, एलेक्स हेल्स, मोर्नी मॉर्केल, मोहम्मद नबी, इमरान ताहिर, टॉम बँटन आणि ख्रिस जॉर्डन यांचाही या यादीत समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी पीसीएलसाठी त्यांच्या उपलब्धेतीची पुष्टी दिली आहे.
✨Platinum Pachees ✨
The six franchises will now be making key trade and retention decisions before the #HBLPSLDraft, with each team allowed a maximum of eight retentions ahead of the Draft.
Who are your top picks from the Platinum Players roster? #HBLPSL pic.twitter.com/aQXaZOVwwx
— PakistanSuperLeague (@thePSLt20) January 5, 2021
आयपीएलमध्ये खेळणार नाही –
स्टेनने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सांगितले होते की तो यावेळी आयपीएल २०२१ च्या हंगामात सहभागी होणार नाही. तसेच या काळात तो कोणतेही क्रिकेट खेळणार नाही. तो त्या कालावधीत विश्रांती घेणार आहे. याबरोबरच त्याने असेही सांगितले होते की त्याने विश्रांती घेतलेली नाही.
Cricket tweet 🏏
Just a short message to let everyone know that I’ve made myself unavailable for RCB at this years IPL, I’m also not planning on playing for another team, just taking some time off during that period.
Thank you to RCB for understanding.
No I’m not retired. 🤙
— Dale Steyn (@DaleSteyn62) January 2, 2021
प्लॅटिनम कॅटेगरीतील २५ परदेशी खेळाडू-
लेंड्ले सिमन्स, कार्लोस ब्रेथवेट, ख्रिस गेल, इविन लुइस, ड्वेन ब्रावो, ख्रिस जॉर्डन, ऍलेक्स हेल्स, मोईन अली, डेविड मलान, टॉम बँटन, कोलिन इनग्राम, इमरान ताहिर, रिली रोसू, डेविड मिलर, रैसी वन डर डसन, डेल स्टेन, मोर्नी मोर्कल, ख्रिस लिन, तिसारा परेरा, इसुरु उडाना, राशिद खान, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, मुस्तफिजुर रहमान, संदीप लामिछाने.
महत्त्वाच्या बातम्या-
‘डेल स्टेन’ने आयपीएलबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय! नववर्षाच्या सुरुवातीलाच आरसीबीच्या चाहत्यांना धक्का
विराट कोहलीच्या ‘या’ फोटोवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून येतायेत मजेदार कमेंट, ‘हे’ आहे कारण
शार्दूल ठाकूरला तिसर्या कसोटीत संघात स्थान द्यावे, माजी खेळाडूंनी मांडले मत