---Advertisement---

IND vs NZ Final: डेरिल मिचेलने अर्धशतक झळकावून रचला इतिहास! दिग्गजांच्या यादीत एँट्री

Daryl-Mitchell-And-Rachin-Ravindra
---Advertisement---

आज (9 मार्च) आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत विरूद्ध न्यूझीलंड संघात खेळला जात आहे. (India vs New Zealand Final) दरम्यान न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि धावफलकावर 251 धावा लावल्या. यादरम्यान डेरिल मिचेलने (Daryl Mitchell) शानदार अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. अर्धशतक झळकावून त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

मिचेलने शानदार फलंदाजी केली. त्याने कठीण परिस्थितीत भारताविरूद्ध शानदार अर्धशतक झळकावले. मिचेलने 101 चेंडूत 63 धावा केल्या. त्याच्या वनडे कारकिर्दीतील हे 7 वे अर्धशतक ठरले. यादरम्यान त्याने दिग्गज रिकी पाॅन्टिंगच्या एका खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे. खरे तर मिचेल आयसीसी वनडे नाॅकआउट सामन्यांमध्ये भारताविरूद्ध दोनदा 50 पेक्षा जास्त धावा करणारा पाचवा क्रिकेटपटू बनला आहे.

मिचेल व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅन्टिग, श्रीलंकेचा माजी महान फलंदाज महेला जयवर्धने, न्यूझीलंडला दिग्गज क्रिकेटपटू केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथनेही भारताविरूद्ध दोनदा आयसीसी नाॅकआउट स्पर्धांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 2023 मध्ये झालेल्या वनडे विश्वचषकाच्या सेमीफायनलध्ये मिचेलने भारताविरूद्ध शतक झळकावले होते.

चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनल सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडसाठी विल यंग 15 धावा, रचिन रवींद्र 37 धावा, यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर विल यंग वरूण चक्रवर्तीच्या जाळ्यात फसला. त्यानंतर डेरिल मिचेलने ग्लेन फिलिप्ससोबत पाचव्या विकेटसाठी 57 आणि मायकेल ब्रेसवेल नाबाद 53 धावा, यांच्यासोबत सहाव्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. यांच्या जोरावर न्यूझीलंडने 7 गडी गमावून 251 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटने मिठी मारली की रिटायरमेंट पक्की! पहा फोटो काय सांगतायेत?
मैदानातच रोहितची विशेष पूजा, जर्सीवर हात ठेवून घेतली देवाची कृपा!
252 धावा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी; भारतासमोर मोठं आव्हान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---