भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२२ स्पर्धा गाजत आहे. याच स्पर्धेत भारतीय चित्रपट ‘पुष्पा’चा फिवर पाहायला मिळाला आहे. अनेक क्रिकेटपटू या गाजलेल्या चित्रपटातील ऍक्शन मैदानात करून दाखवत आहेत. नुकतेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यानेही पंजाब किंग्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर पुष्पा चित्रपटातील ‘झुकेगा नहीं…’ या डायलॉगची ऍक्शन करून दाखवली. त्याला कर्णधार रिषभ पंतचीही साथ मिळाली.
बुधवारी (२० एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (Delhi Capitals vs Punjab Kings) संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीला पंजाबने ११६ धावांचे माफक आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नरने (David Warner) ३० चेंडूत ६० धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्या या खेळीमुळे दिल्लीने ११ व्या षटकातच सामना जिंकला.
हा सामना जिंकल्यानंतर वॉर्नर ‘झुकेगा नहीं…’ ही ऍक्शन (jhunkega nahi) करत आला ड्रेसिंग रुमकडे परतला. तो परत आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतनेही (Rishabh Pant) तशीच ऍक्शन करत त्याची साथ दिली. दरम्यान, वॉर्नरने यापूर्वीही अनेकदा मैदानावर ‘झुकेगा नहीं…’ ही ऍक्शन केली आहे. तोच नाही, तर या आयपीएलदरम्यान अनेक खेळाडूंना असे करताना पाहण्यात आले आहे. यात भारतीय खेळाडूंबरोबरच परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे.
What a way to return to winning ways! 👏 👏@DelhiCapitals put up a dominant show & sealed a clinical 9⃣-wicket win over #PBKS. 👌 👌
Scorecard ▶️ https://t.co/3MYNGBm7Dg#TATAIPL | #DCvPBKS pic.twitter.com/6YpYU4bh18
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2022
इतकेच नाही, तर वॉर्नरने ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर ‘उरी’ चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ हा डायलॉग बोलत सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला. तसेच पाहिले गेले तर वॉर्नरने भारतीय चित्रपटांबद्दलचे प्रेम लपलेले नाही. त्याने अनेकदा भारतीय चित्रपटांमधील गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच वेगवेगळ्या डायलॉगची कॉपीही केली आहे.
Yeh Warner hain, jhukega nahi 🔥@davidwarner31 and @RishabhPant17's #Pushpa pose was just the perfect way to celebrate the win 😎#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvPBKS#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/Wl1BoeTAKD
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 20, 2022
दिल्लीचा विजय
या सामन्यात पंजाबने (DC vs PBKS) प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद ११५ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून जितेश शर्माने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली, तर दिल्लीकडून अक्षर पटेल, कुलदीप यादव, ललीत यादव आणि खलील अहमदने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून पृथ्वी शॉने ४१ धावांची खेळी केली, तर वॉर्नरने नाबाद ६० धावांची खेळी केली. या दोघांनी सलामीला ८३ धावांची भागीदारी केली. तसेच सर्फराज खानने नाबाद १२ धावांचे योगादान दिले. त्यामुळे दिल्लीने ११६ धावांचे आव्हान १०.३ षटकांत पूर्ण केले. त्यामुळे दिल्लीने ९ विकेट्स आणि ५७ चेंडू राखून विजय मिळवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
फक्त नावाचा ‘अर्जुन’ नाही सचिनपुत्र, बाणाप्रमाणे फेकतो यॉर्कर! नेट्समध्ये इशानला केले क्लिन बोल्ड
वॉर्नरने साधली रोहितची बरोबरी! पंजाबविरुद्ध नाबाद ६० धावा करत ‘या’ विक्रमाला गवसणी