भारतात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आयपीएल २०२१ स्थगित करण्यात आली. खेळाडू कर्मचारी या आजाराच्या विळख्यात सापडल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सर्व देशाचे खेळाडू आपापल्या मायदेशी रवाना झाले.
परंतु, ऑस्ट्रेलिया सरकारच्या कोरोना संबंधित नियमांमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अजूनही सर्वसामान्य जीवन अनुभवण्यासाठी मोठी वाट पाहावी लागली. जवळपास २५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी विलगीकरणात घालवल्यानंतर खेळाडू अखेर आपल्या घरी पोहोचले. त्यानंतर, डेव्हिड वॉर्नरने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केलेल्या स्टोरीमध्ये मुलींनी कशाप्रकारे स्वागत केले याची माहिती दिली.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झाला मनस्ताप
आयपीएल २०२१ ही २९ सामन्यांनंतर ४ मे रोजी स्थगित करण्यात आली. इतर देशांचे खेळाडू तात्काळ मायदेशी रवाना झाले. परंतु, ऑस्ट्रेलियन सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूं पुढे पेच निर्माण झाला.
त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू व कर्मचारी असे मिळून ३८ जण मालदीवमध्ये गेले. त्या ठिकाणी १२ दिवस घालवल्यानंतर हे सर्वजण १८ मे रोजी ऑस्ट्रेलियाला पोहोचले. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारच्या कडक नियमांमुळे या खेळाडूंना आणखी १४ दिवस सिडनी येथे हॉटेलमध्ये क्वारंटाईन करून ठेवले आहे.
खेळाडू पोहोचले घरी
भारत ते मालदीव आणि मालदीव ते सिडनी हा क्वारंटाईन प्रवास पूर्ण केल्यानंतर सोमवारी (३१ मे) सर्व खेळाडू व प्रशिक्षक आपापल्या घरी पोहोचले. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याच्या पत्नीने इंस्टाग्रामवर शेअर केल्या स्टोरीमध्ये आपल्या तीन मुलींसोबत वेळ घालवताना दिसतोय. आपल्या सर्वात लहान मुलीला त्याने कडेवर घेतल्याचे दिसले. या स्टोरीला ‘वेलकम होम डॅडी’ असे कॅप्शन दिले आहे.
The long awaited reunion 🧡#OrangeArmy #OrangeOrNothing @davidwarner31 pic.twitter.com/JIMUDggWFq
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 31, 2021
वॉर्नरने इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या मुली व पत्नीसोबत वेळ घालवतानाचे छायाचित्र देखील पोस्ट केले.
डेव्हिड वॉर्नर आयपीएल २०२१ मध्ये आपल्या नावारूपास प्रमाणे खेळू शकला नाही. त्याच्यावर संघातून बाहेर पडल्याची तसेच कर्णधारपद होण्याची नामुष्की देखील आली. तो मागील पाच वर्षापासून सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करत होता.
महत्त्वाच्या बातम्या –
” जास्त हिरो बनू नकोस”, नवदीप सैनीने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी केले ट्रोल
ईशान किशनचे झाले ब्रेकअप? गर्लफ्रेंड आदितीच्या पोस्टवरुन चर्चेला उधाण
‘माझे हेडफोन्स कुठे आहेत?’, अनुष्काने विचारलेल्या प्रश्नावर विराटने दिले भन्नाट प्रत्युत्तर