भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगात प्रसिध्द व्यक्तींपैकी एक आहे. त्याचा चाहता वर्ग फक्त भारतातच नसून संपूर्ण जगात आहे.
विराटचा मादाम तुसाद मधील मेणाच्या पुतळ्याचे अनावरण उद्या म्हणजेच 6 जूनला दिल्लीत होणार आहे. याबद्दलची माहिती देताना त्याने ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून व्हिडीअो शेयर केला.
Come 6th of June, let’s play statue! 😉 Excited to be at #MadameTussauds 😃#TussaudsDelhi@MadameTussauds
@tussaudsdelhi pic.twitter.com/074c3lQF0o— Virat Kohli (@imVkohli) June 5, 2018
या व्हिडीअोला चाहत्यांचे भरघोस लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. यातच अॉस्ट्रेलियाचा क्रिकेटर डेविड वॉर्नरनेही इंस्टाग्रामच्या विराटच्या व्हिडीअोला कमेंट टाकली आहे.
“मला तुझा मूळ फोटो मिळू शकतो का ?,” असे वॉर्नरने त्यात विचारले आहे. विराटने सध्या तरी या वॉर्नरच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही.
विराट त्याच्या मेणाच्या पुतळ्याबद्दल खूप उत्सुक आहे. त्याने सोशल साईटवरून चाहत्यांना म्युझियमला भेट देण्यास सांगितले आहे. तसेच तो हेही म्हणाला की,”चाहते कधीही आता सेल्फी घेऊ शकतात.”
मादाम तुसाद म्युझियम मेणाच्या पुतळ्याच्या जगात प्रसिध्द आहे. संपूर्ण दुनियेत ते 24 ठिकाणी आहे.
महत्वाच्या बातम्या –
–कसोटी संघात पुनरागमन आयपीएलमुळेच शक्य झाले- जॉस बटलर
–भारताचा तिसरा मोठा खेळाडूही पडणार अफगाणिस्तान कसोटी मालिकेतून बाहेर?
–विराट जास्तवेळ जिममध्ये जात नाही तरीही एवढा फीट कसा?
–आणि सुनिल छेत्रीने केले पाकिस्तानच्या चाहत्यांसमोर सेलिब्रेशन