---Advertisement---

‘विराट माझ्यावर थुंकला…’, डीन एल्गरचा मोठा आरोप; दोघांमध्ये शिविगाळही झाली

_Virat Kohli Dean Elgar
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज डीन एल्गर भारताविरुद्ध आपला शेवटचा कसोटी सामना खेलला. या सामन्यात विराट कोहली देखील खेळत होता. निवृत्ती भारतीय संघासह विराटकडूनही एल्गरला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळाल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराने नुकतीच अशी माहिती दिली की, विराटसोबत त्याची शिविगाळ झाली होती. एल्गरने 2015 मध्ये भारताविरुद्धच्या सामन्याचा यावेली उल्लेख केला.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात 2015 मध्ये झालेल्या एका सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि डीन एल्गर (Dean Elgar) भिडले होते. या सामन्यातील वाद झाल्यामुळे दोघांमध्ये चांगलीच शिविगाळ झाली होती. एल्गरने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नुकताच हा किस्सा सांगितला. 2015 साली एल्गर पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला होता. मुलाखतीत त्याने दिलेल्या माहितीनुसार विराट त्यावेळी त्याच्या अंगावर थुंकला होता. यावर त्याने विराटला बॅटने मारण्याची धमकी देखील दिली होती.

मुलाखतीत एल्गरला विराट किंवा रविचंद्रन अश्विनसोबत कधी वाद झाला का? असा प्रशन विचारला गेला. यावर एल्गरने होकारार्थी उत्तर दिले. एल्गर म्हणाला, “या दौऱ्यात केलपट्टीवरून मजा घेतली जात होती. त्यावेळी मी फलंदाजीला आलो होतो. मला अश्विनविरुद्ध माझी लय टिकवून ठेवायची होती. त्याचे काय नाव आहे, जेजा, जेजा, जेजा (रविंद्र जडेजा) आणि कोहली माझ्यावर थुंकले. मग मी म्हणालो, तुम्ही असे केले, तर मी या बॅटने तुम्हाला मारेल.” एल्गरने यावेळी विराटला शिवी देखील दिली होती.

“विराटला तुझी स्थानिक भाषा समजली का?” असा प्रश्न मुलाखतकार एल्गरला विचारतो. उत्तरात एल्गर म्हणाला, “होय, त्याला समजले होते. कारण आरसीबीमध्ये डिविलियर्स त्याचा सहकारी खेळाडू होता. मी त्याला म्हणालो होतो, तू असे केले तर मी तुला याच मैदानात****. मी तुला इथेच आपटील. त्यावर विराट म्हणाला****, तू चुकीच्या जागी (भारतात) हे सर्व बोलत आहेस. आम्ही तेव्हा भारतात होतो, त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Smash Sports (@smashsportsinc) 

एल्गरने पुढे असाही खुलासा केला की, 2017-18 मध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात विराटने आपल्या वागणूक चुकीची असल्याचे मान्य केले आणि माफी देखील मागितली होती. दरम्यान, रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ मायदेशात पाच सामन्याची कसोटी मालिका खेळत आहे. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत पहिला सामना पाहुण्यांनी जिंकला आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (2 फेब्रुवारी) विशाखापट्टणममध्ये सुरू होईल. (Dean Elgaran and Virat Kohli had an argument in 2015)

महत्वाच्या बातम्या – 
राज्य बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश प्रथम । विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा । स्पर्धेच्या अकराव्या दिवशी महाराष्ट्राला १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---