कटक- भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या (India vs Windies ODI Match) तिसर्या वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे. दीपक चाहरच्या (Deepak Chahar) जागी नवदीप सैनीचा (Navdeep Saini) संघात समावेश करण्यात आला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे दीपकला बाहेर काढण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने तपासणीनंतर चाहरला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. “या वेगवान गोलंदाजाला (चाहर) तंदुरुस्त होईपर्यंत विश्रांती घ्यावी लागेल,” असे वैद्यकीय पथकाने यावेळी सांगितले.
दीपक चाहरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात पाठीच्या दुखापतीची तक्रार केली होती. याआधी भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यापूर्वीच दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत.
भुवनेश्वरच्या जागी शार्दूल ठाकूरचा (Shardul Thakur) आणि धवनऐवजी मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) चा संघात समावेश करण्यात आला आहे.
निर्णायक तिसरा वनडे सामना रविवारी (22 डिसेंबर) कटक (Cuttack) येथे दुपारी 1.30 वाजता पार पडणार आहे.
ब्रायन लाराच्या मते विराट कोहली आहे क्रिकेटचा रोनाल्डो
वाचा- 👉https://t.co/vNnxp5igSX👈#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019
आयपीएल २०२०मध्ये दिसणार नाही जहीर खान!
https://t.co/WYM24HuNPD#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPL2020Auction— Maha Sports (@Maha_Sports) December 19, 2019