---Advertisement---

गतविजेता रायगड, पुणेसह यजमान रत्नागिरीच्या संघांचा बादफेरीत प्रवेश

On: शनिवार, डिसेंबर 21, 2019 2:41 PM
---Advertisement---

चिपळूण। गतविजेता रायगड, उपविजेता सांगलीसह रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, बीड, धुळे, अहमदनगर व नंदुरबार पुरुष संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिला गटात गतविजेते पुणे, उपविजेते मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, रायगड, सांगली व सातारा संघानी बादफेरीत प्रवेश मिळवला.

चिपळूण येथे ६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी साखळी सामने पार पडले. सायंकाळ सत्रात महिला गटात औरंगाबादने ४७-१९ असा दुसरा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश केला. सविता शिंदे, आरती ससाणे यांनी चांगला खेळ केला. औरंगाबादने काल मुंबई उपनगरच्या संघाचा धक्कादायक पराभव केला होता. रायगड महिला संघाने ३५-२२ असा परभणी संघावर विजय मिळवला.

पुरुषांच्या ‘अ’ गटात रायगड विरुद्ध ठाणे या गटातील महत्वपूर्ण लढतीत रायगड संघाने ३२-२८ अशा फरकाने बाजी मारली. बिपिन थले व संकेत बनकर यांनी चांगला खेळ केला. तर पुणे संघाने कोल्हापूर संघावर ३१-११ असा विजय मिळवत ‘फ’ गटातुन विजयी झाले. पुणेकडून अक्षय जाधव व विकास काळे यांनी उत्कृष्ट खेळ केला.

मुंबई शहर विरुद्ध बीड यांच्यात झालेल्या लढतीत मुंबई शहराने ३८-२५ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत मिळवला. तर रत्नागिरीने अहमदनगर संघावर ५३-४५ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. कोल्हापूर संघाने ठाणे संघाचा ५४-२५ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.

महिला गटात मुंबई शहरने जळगाववर ४७-०६ असा विजय मिळवत बादफेरी गाठली. तर रत्नागिरी संघाने रायगडला ४३-१९ असे नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. सातारच्या सोनाली हेलवीने एकतर्फी झुंज देत पालघर संघावर ३६-३२ असा विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.

बादफेरीचे सामने पुरुष विभाग:-

उपउपांत्यपूर्व फेरी सामने – 
१) बीड विरुद्ध मुंबई उपनगर
२) धुळे विरुद्ध कोल्हापूर
३) अहमदनगर विरुद्ध पुणे
४) ठाणे विरुद्ध नंदुरबार

बादफेरीचे सामने महिला विभाग:-

उपउपांत्यपूर्व फेरी सामने-
१) पालघर विरुद्ध कोल्हापूर
२) मुंबई उपनगर विरुद्ध नाशिक
३) रायगड विरुद्ध मुंबई शहर
४) सांगली विरुद्ध ठाणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---