इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधून मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा झटका बसला आहे. दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्ली संघाच्या वैद्यकीय पथकाकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. विशेष म्हणजे, पॅट्रिक हे अनेक वर्षे भारतीय संघाचेदेखील फिजिओ होते.
चेन्नई आणि कोलकाता संघालाही मोठा धक्का
याव्यतिरिक्त आयपीएलच्या १५व्या हंगामातून आणखी एक महत्त्वाची बामती समोर येत आहे, ती म्हणजे चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) हा स्पर्धेतून पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर पडला आहे. तसेच, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा गोलंदाज रसिख सलाम (Rasikh Salam) हा देखील पाठीच्या दुखण्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या हंगामात त्याने कोलकाता संघाकडून २ सामनेही खेळले होते. अशात कोलकाता संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे.
https://twitter.com/IPL/status/1514922983717961729
चेन्नई आणि कोलकाता संघांची आयपीएल २०२२मधील कामगिरी
यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला खास कामगिरी करता आलेली नाहीये. त्यांनी हंगामातील ५ सामन्यांपैकी फक्त १ सामना जिंकला आहे, तर उर्वरित ४ सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ५ पैकी ३ सामन्यात विजय, तर २ सामन्यात पराभव पत्करला असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मागील वर्षी यूएईत पार पडला आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा
मागील वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईत पार पडला होता. मात्र, यावर्षी जेव्हा कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर आयपीएल २०२२चे आयोजन भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात करण्याचे निश्चित झाले. हंगामातील ७० साखळी सामने हे मुंबई आणि पुण्याच्या ४ स्टेडिअमवर खेळवले जात आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बडे दिलवाला जोस! ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हार्दिक पुढे निघून गेल्यानंतर बटलरने असे काही करत जिंकली मने
कोलकाता-चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंचा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सन्मान, मिळाले मोठे पुरस्कार
Video: युझवेंद्र चहलने जोस बटलरची केली पायखेची; विचारले, ‘माझ्या फलंदाजीवर का जळतोय?’