मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३० वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर सोमवारी (१८ एप्रिल) पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थानने ७ धावांनी विजय मिळवला. हा त्यांचा हंगामातील चौथा विजय ठरला. याच सामन्यादरम्यान राजस्थानकडून सलामीला खेळणाऱ्या देवदत्त पडीक्कल याने एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
२१ वर्षीय पडीक्कलने या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानकडून १८ चेंडूत २४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने आयपीएलमध्ये आपल्या १००० धावा पूर्ण केल्या आहे. त्यामुळे तो आता आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात १००० धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा क्रिकेटपटू ठरला आहे.
सोमवारी जेव्हा पडीक्कलने १००० धावा पूर्ण केल्या, तेव्हा तो २१ वर्षे २८५ दिवसांचा होता. त्यामुळे त्याने सर्वात कमी वयात १००० आयपीएल धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकले. विराने २२ वर्षे १७५ दिवस एवढे वय असताना आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या. या यादीत रिषभ पंत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने २० वर्षे २१८ वय असताना आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या.
याशिवाय पडीक्कल हा आयपीएलमध्ये डावांच्या तुलनेत सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत देखील तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने सोमवारी खेळलेला त्याचा आयपीएलमधील ३५ वा डाव होता. त्याने या यादीत तिसऱ्या क्रमांकावरील रिषभ पंतची बरोबरी करताना रोहित शर्माला मागे टाकले आहे. रिषभ पंतनेही ३५ व्या डावात आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच रोहितने ३७ डावात १००० आयपीएल धावा पूर्ण केल्या होत्या. ३१ डावांसह सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे.
आपीएलमध्ये सर्वात कमी वयात १००० धावा करणारे क्रिकेटपटू
२० वर्षे २१८ दिवस – रिषभ पंत
२१ वर्षे १७९ दिवस – पृथ्वी शॉ
२१ वर्षे १८३ दिवस – संजू सॅमसन
२१ वर्षे २२२ दिवस – शुबमन गिल
२१ वर्षे २८५ दिवस – देवदत्त पडीक्कल
२२ वर्षे १७५ दिवस – विराट कोहली
आयपीएलमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारे क्रिकेटपटू
३१ डाव – सचिन तेंडुलकर
३४ डाव – सुरेश रैना
३५ डाव – देवदत्त पडीक्कल
३५ डाव – रिषभ पंत
३७ डाव – रोहित शर्मा
राजस्थानने जिंकला सामना
या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलरने १०३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ५ बाद २१७ धावा केल्या आणि कोलकाता समोर २१८ धावांचे आव्हान ठेवले. कोलकाताकडून सुनील नारायणने २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून श्रेयस अय्यरने ८५ आणि ऍरॉन फिंचने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली. पण युजवेंद्र चहलच्या ५ विकेट्समुळे कोलकाताला १९.४ षटकांत सर्वबाद २१० धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
श्रेयस अय्यरचे केकेआरचा प्रशिक्षक मॅक्युलमशीच झाले भांडण? Video व्हायरल
चहल आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारा १८ वा खेळाडू; याआधी ‘या’ १७ गोलंदाजांनी केलाय असा कारनामा
एकच नंबर! कोलकाताच्या मावी-कमिन्स जोडीचा बाऊंड्री लाईनजवळ अप्रतिम कॅच, पाहा Video