काहीदिवसांपूर्वीच इंग्लंड संघाला न्यूझीलंड संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. आता न्यूझीलंड संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध खेळत आहे. भारतीय संघाविरुद्ध अंतिम सामना खेळण्याअगोदर न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेचे प्रशिक्षक ग्लेन पॉकनाल यांनी त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.
त्यांनी विश्वास व्यक्त करताना म्हटले आहे की तो दिवस दूर नाहीय जेव्हा धाकड खेळाडूसाठी आयपीएलमध्ये मोठी बोली लागेल.
ग्लेन पॉकनाल यांना डेवोन कॉनवेला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना पाहायचे आहे. त्याचबरोबर त्यांचे स्वप्न आहे की, रोहित शर्मा आणि कॉनवेला सलामीला फलंदाजी करताना पाहायचे आहे.
एका वेबसाईटसोबत बोलत असताना पॉकनाल यांनी सांगितले की, ‘त्याला 2021 मधील आयपीएल लिलावामध्ये खरेदी न केल्यामुळे मला आश्चर्य वाटले नाही. त्याची वेळ येईल, मला खात्री आहे.”
पुढे पॉकनाल म्हणाले की, ‘कॉनवेनी मधल्या फळीत आणि सलामीला खेळताना आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली फलंदाजी केली आहे. संघाला गरज असताना त्याने मैदानावर टिकून खेळी केली आहे. कॉनवे हा आयपीएलमधील सर्व संघांना आकर्षित करून घेणारा खेळाडू आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघामध्ये रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करताना पाहण्यास खूप इच्छा आहे.’
कॉनवेने इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यातच कॉनवेने पहिल्या डावात २०० धावांची खेळी केली होती. तो पदार्पणात लॉर्ड्सवर द्विशतक करणारा एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिषभ पंतने तसा फटका मारला तर हा माझा अपमान”
‘त्या’ कृत्यामूळे घडले सिराजच्या माणुसकीचे दर्शन, व्हिडिओ होतोय व्हायरल
कोहलीचा ‘विराट’ विक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा बनला पहिला आशियाई कर्णधार