यंदाचा आयपीएल हंगाम जसजसा पुढे जात आहे. तसतसा तो अधिकच रंगतदार होत चालला आहे. प्रत्येक सामना रोमांचक होताना दिसतोय, तर प्रत्येक सामन्यात कोणता कोणता खेळाडू आपली चमकदार कामगिरी दाखवत छाप पाडत आहे. तत्पूर्वी चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नईच्या संघात एका विस्फोटक खेळाडूची एँट्री झाली आहे.
चेन्नईने यंदाच्या आयपीएल हंगामासाठी गुरजनप्रीत सिंगच्या जागी डेवाल्ड ब्रेव्हिसला (Dewald Brevis) संघात स्थान दिलं आहे. (CSK Has Signed Dewald Brevis For IPL 2025)
🚨 BREVIS TIME IN CSK. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 18, 2025
– Dewald Brevis has replaced Gurjapneet Singh in CSK squad for IPL 2025. pic.twitter.com/csnTTQmhv9
डेवाल्ड ब्रेविसला, ‘बेबी एबी’ म्हणूनही ओळखले जाते, त्याने 2022 मध्ये चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याच्या कारकिर्दीत तो फक्त फलंदाज म्हणून नव्हे, तर गोलंदाज म्हणूनही काही वेळा प्रभावी ठरला आहे. ब्रेविसच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले, ज्यात त्याने 230 धावा केल्या आहेत. दरम्यान फलंदाजी स्ट्राईक रेट 133.72 राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये 16 षटकारांसह 17 चौकार लगावले आहेत. त्याच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने एक विकेटही घेतली आहे. आता चेन्नईच्या संघात तो कशी कामगिरी करतो? हे पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरेल.