भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत, भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला होता. यानंतर होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हेदेखील पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांचा पुणे विमानतळावरील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड संघाला ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर पुढील ३ वनडे सामन्यांची मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हे सामने २३ ,२६ आणि २८ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय संघ २१ मार्च रोजीच पुण्यात दाखल झाला आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री हे दोघेही भारतीय संघासोबत चार्टर्ड प्लेनमधून उतरतांना दिसून आले.
तसेच धनश्री आणि चहलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पुण्याचा दिशेने जात असतानाचे फोटोज् शेअर केले होते. यासोबतच इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चहल जोडीसह भारतीय संघातील खेळाडू विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि इतर खेळाडू आपल्या कुटुंबासोबत विमानातून बाहेर येताना दिसत आहेत. तसेच इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवने देखील आपली पत्नी देविशासोबत पुण्यात हजेरी लावली आहे.
भारतीय खेळाडू सहकुटुंब पुण्यातील कॉनराड पुणे या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलमध्ये स्विमिंग पूलपासून ते जिमपर्यंत सर्व सोईसुविधा उपलब्ध आहेत.
https://www.instagram.com/p/CMsWH-6gGQc/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CMsR3WXAH7Z/?utm_source=ig_web_button_share_sheet
असा असेल वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर,सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युझवेद्र चहल, कृणाल पंड्या, कुलदीप यादव,वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर
महत्त्वाच्या बातम्या-
कृणाल पंड्याचे पदार्पण, तर मार्क वुडचे पुनरागमन; ‘असा’ असेल पहिल्या वनडेसाठी भारत-इंग्लंड संघ
अखेर इंग्लिश दिग्गजाने भारताला मानलं; म्हणाले, “विराट-रोहितमध्ये सचिन-सेहवागची झलक दिसली”
विराटसोबत ओपनिंग करण्याबद्दल विचारल्यावर रोहितने सोडले मौन; म्हणाला, ‘आम्ही शेवटपर्यंत…’