---Advertisement---

नांदेडकरांना लाभणार रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णीचे मार्गदर्शन, लवकरच सुरू करणार क्रिकेट अकादमी 

---Advertisement---

भारत हा क्रिकेटवेड्या लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील बहुसंख्य लोक हे स्वत: कधीतरी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न बाळगतात अथवा आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिसतात. अनेक आजी- माजी खेळाडू हे आपली क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर क्रिकेट अकादमी सुरू करतात. आपल्या भविष्याचा विचार करता आपल्या अकादमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवण्याचे काम ते करत असतात. रॉजर बिन्नी, मदनलाल, दिलीप वेंगसरकर, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी या खेळाडूंच्या अनेक अकादमी कार्यरत आहेत. आता या साखळीत रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी यांचे नाव जोडले जाणार आहे.

वेगवान गोलंदाज कुलकर्णी याने सोमवारी (१ फेब्रुवारी) महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी क्रिककिंगडमचे पराग दहिवाल त्याच्यासोबत होते. या भेटीदरम्यान कुलकर्णी आणि दहिवाल यांनी अशोक चव्हाण यांच्याशी नांदेड येथे स्वत:ची क्रिकेट अकादमी सुरू करण्याबाबत विचारविनियम केला.

स्वत: अशोक चव्हाण यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. “प्रख्यात क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी नांदेडला क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहेत. कुलकर्णी व दहिवाल यांनी याबाबत माझ्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. ही अकादमी सुरू झाल्यास नांदेडच्या प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळेल”, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

याबरोबरच गोलंदाज कुलकर्णीनेही ट्विट करत आपल्या आपण नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्याबाबत अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे, कुलकर्णीने अकादमी उभारण्याच्या दृष्टीने नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. तसेच आपल्या भेटीची आठवण म्हणून त्यांनी अशोक चव्हाण यांना भारतीय संघाची एक जर्सी भेट दिली आहे. या अकादमीच्या उभारणीबाबत चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.

धवल कुलकर्णीची क्रिकेट कारकिर्द 

धवल कुलकर्णी हा भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज असून सप्टेंबर २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने वनडे पदार्पण केले होते. तर २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. यादरम्यान १२ वनेड सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने १९ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच २ टी२० सामन्यात ३ विकेट्सची कामगिरी केली आहे.

याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये आजवर त्याने ९१ सामने खेळले आहेत. यादरम्यान १४ धावांवर ४ विकेट्सची सर्वोत्तम कामगिरी करत एकूण ८६ विकेट्स चटकावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या माजी सलामीवीराने निवडली पहिल्या कसोटीतील प्लेईंग इलेव्हन, अक्षर पटेलसह ‘या’ खेळाडूंचा केला समावेश

“भारतीय खेळाडू विराटला घाबरतात”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य

इंग्लंडच्या फिरकीपटूने फुंकले मालिकेचे रणशिंग, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---