---Advertisement---

त्याला बाद करण्यासाठी लावले असे क्षेत्ररक्षण, परंतु झाली निराशा

---Advertisement---

मुंबई । वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात काल अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. परंतु बडोद्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३ गुण मिळवले. मुंबईने दिवसाखेर ७ बाद २६० धावा केल्या.

हा सामना एकवेळ डावाने पराभूत होईल की काय अशी परिस्थिती होती. परंतु गेली ८४ वर्ष मुंबई संघातील एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे खडूस वृत्ती. मुंबईने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात ४ बाद १०२ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी पराभवाची खरी तर औपचारिकता बाकी होती.

परंतु अजिंक्य रहाणे १३४ चेंडूत ४५, सूर्याकुमार यादव १३२ चेंडूत ४४ अभिषेक नायर १०८ चेंडूत ८ धावा आणि सिद्देश लाड २३८ चेंडूत ७१ यांनी अतिशय जबाबदार खेळी केली.

मुंबईची १०९.५व्या षटकात जेव्हा अभिषेक नायरच्या रूपाने ६वी विकेट गेली तेव्हा फलंदाजीला आला वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी. बडोद्याचा कर्णधार दीपक हुडाने यावेळी धवल कुलकर्णीच्या आसपास चक्क १० खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी उभे केले. यावेळी दिवसातील ११ षटके बाकी होती. यानंतर संघाचे केवळ दोन फलंदाज बाकी होते. जर धवलने विकेट्स सोडली असती तर मुंबई कोणत्याही वेळी पराभूत झाली असती. एका बाजूने सिद्देश लाड चांगली खेळी करत होताच.

धवलने हे आव्हान स्वीकारून मुंबईला चक्क पराभवापासून दूर नेले. त्याने ३१ चेंडूचा सामना करत २ धावा केल्या. तो ६५ पैकी चक्क ३१ चेंडू खेळला हे विशेष.

मुंबई संघ गेल्या ६६वर्षात केवळ एकदाच डावाने पराभूत झाला असून याच काळात हा संघ कधीही मुंबईच्या मैदानावर डावाने पराभूत झाला नाही. हा विक्रम कायम ठेवण्याचे काम मुंबईच्या दिग्गज खेळाडूंनी कायम केले.

धवल कुलकर्णी भारताकडूनही १२ वनडे आणि २ टी२० सामने खेळला असून या खेळाडूने यात एकूण २१ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment