भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला जगभरात लाखो चहाते आहेत. तसेच तो भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडूही ठरला आहे.
याबद्दल YouGov तर्फे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यात 4 मिलियनपेक्षा जास्त लोकांचे आॅनलाईन विविध पोल्स आणि सर्वे घेण्यात आले होते.
यातील आकडेवारीनुसार धोनी खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याचा प्रशंसनीय स्कोर 7.7% इतका आला आहे. तसेच तो एकूण सेलिब्रेटींच्या यादीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे आहे.
खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 6.8 % स्कोरसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा स्कोर 4.8% आला आहे.
धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. तसेच 2009 च्या आयसीसी क्रमवारीत तो अव्वल क्रमांकावरही होता.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे विश्वचषक, टी20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत.
धोनीने 2007 ते 2016 दरम्यान भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले. त्याने जानेवारी 2017 मध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडले. तर त्याआधीच धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
धोनीने भारताचे 199 वनडे, 60 कसोटी आणि 72 टी20 असे मिळून एकूण 331 सामन्यात कर्णधारपद भूषवले आहे.
पण आता भारताच्या नेतृत्वाची धूरा संभाळत असलेला विराट येत्या काही वर्षात लोकप्रियतेतही पुढे येईल. तो सोशल मिडियावर सचिन आणि धोनी यांच्या बराच पुढे आहे. त्याला इंस्टाग्रामवर सचिन आणि धोनी यांचे मिळून असलेल्या फॉलोअर्सपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-तो एक स्वार्थी, गर्विष्ठ आणि हुकूमशहा आहे, आम्हाला तो कर्णधार म्हणुन नकोच
-टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!
–इम्रान खानने पाकिस्तान जिंकले, आता संभाळणार संसदेचे कर्णधारपद