भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यावेळी अखेरच्या आयपीएल हंगामात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. आपल्या दैदिप्यमान कारकीर्दत त्याने भारतीय संघासोबतच चेन्नई सुपर किंग्स संघाला देखील यशस्वी करून दाखवले. चार आयपीएल विजेतेपदे कर्णधार म्हणून नावावर असलेल्या धोनीला एक वेळ याच आयपीएलमधून कर्णधारपदावरून पायउतार करण्यात आलेले. त्यावेळी त्याची पत्नी त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली.
धोनीने 2008 ते 2015 अशी सलगपणे 8 वर्ष चेन्नई सुपर किंग्सची कमान सांभाळली. या कालावधी त्याने दोन वेळा चेन्नईला विजेते बनवले. त्यासोबतच सहा वेळा चेन्नई संघ अंतिम सामन्यात खेळला होता. त्यानंतर 2016 व 2017 या कालावधीसाठी चेन्नई संघाला निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी दोन वर्षासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला स्पर्धेत संधी देण्यात आलेली.
पुणे संघाने धोनीला 2016 मध्ये कर्णधार बनवले. मात्र, संघ अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरला. संघाला आठ संघांच्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर समाधान मानावे त्यानंतर पुढील वर्षीचा हंगाम सुरू होण्याआधी अचानकपणे संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथ याच्याकडे देण्याचा निर्णय घेतला गेला. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
पुणे संघाचे संघमालक असलेल्या संजीव गोयंका यांनी संघाला युवा कर्णधार हवा होता असे वक्तव्य केले. त्यानंतर पुणे संघाने स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केल्यानंतर संजीव यांचे बंधू हर्ष गोयंका यांनी स्मिथला कर्णधार बनवण्याचा निर्णय योग्य होता अशा प्रकारचे ट्विट केले. यानंतर धोनीची पत्नी साक्षी हिने धोनीचा चेन्नईच्या जर्सीतील फोटो उत्तर म्हणून रिट्विट केला. पुणे संघाने त्यावर्षी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
पुढच्या वर्षी चेन्नई संघ पुन्हा आयपीएलमध्ये आल्यानंतर धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने विजेतेपद जिंकून योग्य उत्तरे दिली.
(Dhoni Wife Sakshi Epic Reply To Rising Pune Supergiants Owner Harsh Goenka After Dhoni Captaincy Ommision)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रक्त काढणारा चेंडू! पाकिस्तानी गोलंदाजाच्या खुंखार चेंडूने फोडला फलंदाजाचा जबडा, पाहा व्हिडिओ
IPLपूर्वी हॉटेल रूमचा पासवर्ड विसरला सूर्या, ‘सुपला शॉट’ म्हणताच घडलं ‘असं’ काही; विराटचीही खास कमेंट