भारतीय महिला क्रिकेट टी 20 संघाची कर्णधार व स्फोटक फलंदाज हरमनप्रीत कौरला आपण नेहमीच 84 क्रमांकच्या जर्सीत खेळताना पाहिले आहे. तिच्या 84 क्रमांकाच्या जर्सीमागचे एक खास कारण आहे. हे कारण फक्त काहीच लोकांनाच माहित आहे.
यामागचे कारण असे की हरमनप्रीतच्या भावनिक आठवणी या क्रमांकाशी जोडल्या गेल्या आहेत. 1984 हे साल शीख दंगलच्या आठवणी करून देतात. त्यामुळे या दंगल पीडितांच्या एकत्रिकरणासाठी हरमनप्रीत ही जर्सी घालते.
काही वेळा तिला मैदानावर 17 क्रमांकाच्या जर्सीत सुध्दा बघितले आहे. तर बिग बैश लीगमध्ये ती 84 क्रमांकाचीच जर्सी घालते.
— Harmanpreet Kaur (@ImHarmanpreet) March 18, 2016
हरमनप्रीतला मिळाला आहे अर्जून पुरस्कार
2017च्या विश्वचषकामध्ये हरमनप्रीत चांगली कामगिरी केली होती. यात हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाच्या विरूद्ध उपांत्य सामन्यात 115 चेंडूत 171 धावांची नाबाद वादळी खेळी केली होती. हरमनप्रीत कौर ही भारताची महिला टी 20 संघाची कर्णधार आहे. तसेच सध्या पंजाबच्या पोलिस उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहे. याआधी ती भारतीय रेल्वेत अधीक्षक पदावर होती.
हरमनप्रीतचा पहिला लकी टीशर्ट
हरमनप्रीत कौरचे वडील सतविंदर सिंग हे पण एक खेळाडू होते. वयाच्या 20व्या वर्षी हरमनप्रीतने क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. जेव्हा तीचा जन्म झाला तेव्हा तिला गुड बॅटिंग असे चित्र असलेला टीशर्ट घातला होता. त्या चित्रात ‘फलंदाज फटका मारतानाचे’ दृश्य होते. हरमनप्रीतच्या कुटूंबाला सुद्धा असे वाटते की, ती आत्ता जे काही आहे त्यात या टीशर्टचे पण काही योगदान आहे.
महिला क्रिकेट मधील हरमनप्रीतचे वर्चस्व
हरमनप्रीत कौरने भारतासाठी 81 वनडेत 2121 धावा केल्या आहेत. यात तिची सरासरी 37.21 एवढी असून यामध्ये 3 शतक आणि 11 अर्धशतक यांचा समावेश आहे. वनडेत तिची सर्वोत्तम खेळी ही नाबाद 171 अशी आहे. तर 73 टी20 सामन्यात हरमनप्रीतने 25.58 सरासरीने4 अर्धशतकांसह 1305 धावा बनविल्या आहेत. यात तिची 77 धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.