गुरुवारी(19 डिसेंबर) आयपीएल 2020 साठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात 4 वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने 21 वर्षीय दिग्विजय देशमुखला 20 लाखांमध्ये खरेदी करत संघात सामील करुन घेतले आहे.
पण अनेकांना दिग्विजयबद्दल एक खास गोष्ट माहित नाही, ती म्हणजे 2013मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काय पो छे’ या बॉलिवूड चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून ‘अली’ या नावाच्या लहान क्रिकेटपटू मुलाची भूमिका केली होती. त्यावेळी तो केवळ 14 वर्षांचा होता.
मात्र जरी त्याने चित्रपटात अभिनय केला असला तरी क्रिकेट हिच त्याची पहिली आवड असल्याचे त्याने म्हटले आहे. याबद्दल त्याने पीटीआयला सांगितले की ‘मी चित्रपटात काम केले, पण मी कधीही अभिनेता नव्हतो. मी एक क्रिकेटपटू आहे. आता मला हळू हळू माझ्या स्वप्नांची जाणीव होत आहे.’
तो चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल म्हणाला, ‘मी 14 वर्षांखालील शालेय स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईला गेलो असताना चित्रपटाच्या एका सहाय्यक दिग्दर्शकाने माझी ऑडिशनसाठी निवड केली आणि नंतर मला ती भूमिका मिळाली.’
‘सर्वजण खूप छान वागत होते. मला आठवते मी सुशांत सिंग राजपूत आण राजकुमार राव यांच्याबरोबर खूप क्रिकेट खेळलो. मी केलेली भूमिका आणि माझ्यात काहीसे साम्य आहे. मी सुद्धा मीतभाषी आणि शांत आहे.’
त्याचबरोबर दिग्विजय असेही म्हणाला की ‘लोक जेव्हा मला फक्त अभिनेता म्हणून ओळखतात तेव्हा मला राग येतो. यामुळे मी विचलित होतो. मी चित्रपटात काम केले कारण त्यातील अनेक दृश्य क्रिकेट खेळतानाची होती. पण चार महिने बाहेर राहिल्याने माझ्या क्रिकेटवर परिणाम होत होता आणि मला ते परत व्हायला नको होते.’
‘मला टेलिव्हिजनवर जाहिरातीच्या ऑफरही आल्या होत्या पण मी त्या नाकारल्या. माझ्या पालकांनीही मला पाठिंबा दिला,’ असेही दिग्विजयने सांगितले.
दिग्विजयने याचवर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राच्या संघाकडून पदार्पण केले आहे. त्याने सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये खेळताना 7 सामन्यात मिळून 9 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच आयपीएल 2020 चा लिलावादरम्यान दिग्विजयने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात जम्मू आणि काश्मिर विरुद्ध दुसऱ्या डावात 46 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्याने 83 धावांची खेळीही केली. तसेच त्याआधी त्याने पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या होत्या.
गंभीर म्हणतो, हा गोलंदाज अजून तरी ८.५० कोटी रुपयांसाठी पात्र नाही
वाचा- 👉https://t.co/FZm2QHf4JI👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
…म्हणून सीएसकेने पीयूष चावलावर लावली ६.७५ कोटींची बोली, प्रशिक्षक फ्लेमिंगने केला खूलासा
वाचा- 👉https://t.co/aLM8daHCzz👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019