पुणे । बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकरमध्ये मुलांच्या गटात हरयाणाच्या दिग्विजय कडीयन याने गतवर्षीचा जुनियर स्नूकर गटातील कांस्य पदक विजेता एस.श्रीकृष्णाचा एकतर्फी पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकर मुलांच्या गटात अंतिम फेरीत हरयाणाच्या 17 वर्षीय दिग्विजय कडीयन याने पीएसपीबीच्या एस. श्रीकृष्णा याचा 4-0(65-44, 55-11, 75-01, 67-32) असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेत याआधी दिग्विजय याने उपांत्य फेरीत मध्यप्रदेशच्या अमन बनसोड याच्यावर 4-0 असा सहज विजय मिळवला होता. अंतिम फेरीच्या लढतीतही दिग्विजयने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. पहिली फ्रेम दिग्विजयने श्रीकृष्णाविरुद्ध 65-44 अशी जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या फ्रेममध्येदेखील दिग्विजयने आपले वर्चस्व कायम राखले व ही फ्रेम 55-11 अशी जिंकून आपली 2-0ने ववाढविली.
पिछाडीवर असलेल्या श्रीकृष्णाला सामन्यात सूर गवसलाच नाही. तिसऱ्या व चौथ्या फ्रेममध्ये दिग्विजयने सुरेख पॉटिंग करत अनुक्रमे दोन्ही फ्रेम 75-01, 67-32 अशा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दिग्विजयने आपल्या खेळीत तिसऱ्या फ्रेममध्ये 50 गुणांचा ब्रेक नोंदविला.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महाराष्ट्राच्या स्पर्श फेरवानी याने मध्यप्रदेशच्या अमन बनसोड याचा 3-2(52-66(59), 58-39, 78-16, 33-52, 68(68)-16) असा संघर्षपूर्ण पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी भारतीय क्र.3 स्नूकर खेळाडू अरुण अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बीएसएएमचे सचिव रिषभ कुमार, बीएसएएमचे समिती सदस्य अमित सप्रू, राजवर्धन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल।
ज्युनियर स्नूकर। उपांत्य फेरी।
एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र) 4-2(63-24, 52-54, 67-74, 93(86)-00, 88-29, 125(66,59)-03)
दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.अमन बनसोड(आंध्रप्रदेश)4-0(82-23, 107(107)-15, 69-43, 61-29);
अंतिम फेरी: दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि. एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी) 4-0(65-44, 55-11, 75-01, 67-32)
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी: स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)वि.वि.अमन बनसोड(आंध्रप्रदेश)3-2(52-65(59), 58-39, 78-16, 33-52, 68(68)-16);
वरिष्ठ बिलियर्ड्स।
गटसाखळी फेरी।
गट अ: लौकी पठारे(आरएसपीबी)वि.वि.सुशील वेलंकी(आंध्रप्रदेश)3-0(153-123, 154-80, 155-109);
गट ब: ध्वज हारिया(पीएसपीबी)वि.वि.मोहम्मद अर्शद(केरळ)3-0(152(105)-25, 151(96)-60, 151-44);
गट क: जगदीश बी(तामिळनाडू)वि.वि.अतीत शहा(केरळ)3-1(150(60)-58, 126-150, 150(72)-59, 151(82)-26);
गट क: ध्रुव सितवाला(पीएसपीबी)वि.वि.अंकित करीवाला(पश्चिम बंगाल)3-0(150(146)-00, 150(50,75)-42, 150(131)-19);
गट ड: पार्थव झवेरी(गुजरात)वि.वि.भुवनेश्वदन(तामिळनाडू)3-0(150-25, 150(62)-51, 151(84)-06);
गट इ: सिद्धार्थ पारीख(आरएसपीबी)वि.वि.आकाश वाधवानी(राजस्थान)3-0(151(69)-27, 150(41,43)-36, 150(94)-72);
गट इ: हिमांशू जैन(तेलंगणा)वि.वि.शाहबाज खान(पीएसपीबी)3-1(152-67, 150-57, 83-152, 150-129);
गट फ:रोहन जांबूसारिया(महाराष्ट्र)वि.वि.सुब्रत दास(ओडिशा)3-1(77-150, 151-79, 150(42)-120, 151(45,48,41)-32);
गट ग:बी. भास्कर(कर्नाटक)वि.वि.राज मोहन 3-0(151-31, 151(143)-00, 152-14);
गट ह: रुपेश शहा(पीएसपीबी)वि.वि.सिद्धार्थ पटनी(मध्यप्रदेश)3-0(152(144)-46, 151(113)-09, 150(101)-40);
गट ह: राफत हबीब(आरएसपीबी)वि.वि.कुणाल अगरवाल(ओडिशा)3-0(151(50)-48, 150-52, 150(80)-71);
गट ओ: राज खांडवाला(महाराष्ट्र)वि.वि.करमेश पटेल(गुजरात) 3-1(150-130, 89-150, 152-131, 150-55);